Advertisement

मुंबईत पेट्रोल नव्वदी गाठणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ६ ते ८ रुपयांनी वाढ झाल्यास मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ९० रुपयांवर जाऊ शकते. सद्यस्थितीत मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८३.१६ रुपयांना विकलं जात आहे. तर दिल्लीत सध्या प्रति लिटर ७५.३२ रुपयांना असलेलं पेट्रोल ८० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. याच तऱ्हेने कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर ८४ ते ८५ रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.

मुंबईत पेट्रोल नव्वदी गाठणार?
SHARES

मुंबईसह देशभरात येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचा भडका उडण्याची दाट शक्यता आहे. या मागचं कारण आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारात उसळलेल्या कच्च्या इंधनाच्या किंमती आणि कर्नाटक निवडणुकीदरम्यान तेल कंपन्यांनी दाखवलेल्या संयमाने झालेला प्रचंड तोटा. हा तोटा भरून काढण्यासाठी लवकरच तेल कंपन्या सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्याची शक्यता आहे. त्यातून पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रति लिटर किमान ६ ते ८ रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे.

६ ते ८ रुपयांची वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ६ ते ८ रुपयांनी वाढ झाल्यास मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ९० रुपयांवर जाऊ शकते. सद्यस्थितीत मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८३.१६ रुपयांना विकलं जात आहे. तर दिल्लीत सध्या प्रति लिटर ७५.३२ रुपयांना असलेलं पेट्रोल ८० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. याच तऱ्हेने कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर ८४ ते ८५ रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅइल ७ ते ८ टक्क्यांनी महाग होण्याचे संकेत आहेत. यामुळे डिझेलच्या किंमतीत देखील येत्या काही महिन्यांमध्ये अंदाजे ३ ते साडेतीन रुपये प्रति लिटरने वाढ होण्याची शक्यता आहे.

कारण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात गुरूवारी क्रूड आॅइलचा (कच्चे तेल) दर ८० डाॅलर प्रति बॅरलच्या पलिकडे गेला. यामुळे भारतीय बास्केटमध्येही क्रूड आॅइलचे दर वाढले. सोबतच डाॅलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचा फटकाही भारतीय तेल कंपन्यांना बसत आहे. त्यांना क्रूड आॅइल खरेदी करण्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागत आहे. हे दर ८५-९० डाॅलर प्रति बॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

५०० कोटींचा तोटा

अशा स्थितीत भारतीय तेल कंपन्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान इंधनाच्या किंमतीत कुठलीही वाढ केली नाही. १२ मे रोजी कर्नाटकात मतदान झाल्यानंतर १९ दिवसानंतर १४ मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. या कालावधीत तेल कंपन्यांना साधारणत: ५०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. हा तोटा भरून काढण्यासाठी लवकरच इंधनाच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

हेही वाचा-

कर्नाटक निवडणूक होताच पेट्रोल-डिझेलचा भडका

कर्नाटकात शिवसेनेवर नामुष्की, सर्व उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा