Advertisement

पेट्रोल@८२.४८, किंमती ३ वर्षांच्या उच्चांकी

इंडियन आॅइलच्या बेवसाइटवरील माहितीनुसार, मुंबईतील पेट्रोलचे दर १३ पैशांनी वाढून प्रति लिटर ८२.४८ रुपयांवर तर डिझेलचे दर १९ पैशांनी वाढून प्रति लिटर ७०.२० वर जाऊन पोहोचले आहेत. तसंच दिल्लीत पेट्रोल ७४.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ६५.९३ रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. यामुळे वाहन चालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.

पेट्रोल@८२.४८, किंमती ३ वर्षांच्या उच्चांकी
SHARES

क्रूड आॅइल उत्पादक देशांनी (ओपेक) आॅइलच्या उत्पादनातील कपात सुरूच ठेवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला आहे. परिणामी मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने ३ वर्षांतील उच्चांक गाठला.

मुंबईत किती दर?

इंडियन आॅइलच्या बेवसाइटवरील माहितीनुसार, मुंबईतील पेट्रोलचे दर १३ पैशांनी वाढून प्रति लिटर ८२.४८ रुपयांवर तर डिझेलचे दर १९ पैशांनी वाढून प्रति लिटर ७०.२० वर जाऊन पोहोचले आहेत. तसंच दिल्लीत पेट्रोल ७४.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ६५.९३ रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. यामुळे वाहन चालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.

क्रूड आॅइल ७० टक्के महाग

जून २०१७ पासून क्रूड आॅइलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जून २०१७ मध्ये क्रूड आॅइलची किंमत प्रति बॅरल ४४ डाॅलर एवढी होती. तर सद्यस्थितीत क्रूड आॅइल प्रति बॅरल ७५ डाॅलरवर जाऊन पोहोचली आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१९ मध्ये क्रूड आॅइलच्या किंमती आणखी १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-

मुंबईत पेट्रोल दरवाढीचा भडका! ५५ महिन्यांतील सर्वोच्च दर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा