माहीम खाडिजवळ पाईपलाईन फुटली, वांद्रेसह दादर इथल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

२५ नोव्हेंबर रोजी तानसाची मुख्य पाण्याची पाइपलाइन माहीम खाडीजवळ फुटली होती. याचा वांद्रे पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. शिवाय, प्रभादेवी आणि दादरच्या काही भागातही पाणीपुरवठा खंडित झाला. पाईपलाइन फुटल्यानं शेकडो लिटर पाणी वाया गेलं.

वृत्तानुसार, ही घटना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ (WEH) जवळ २५ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. ही पाईपलाईन तानसा तलावाच्या पूर्वेकडील भागातून असल्यानंतानसा पूर्व मुख्य पाइपलाइन म्हणूनही ओळखली जाते.

पालिकेच्या हायड्रॉलिक अभियंता विभागाचे अधिकारी घटनास्थळावर असून गळतीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

तानसा तलावापासून वांद्रे आणि खार या निवासी भागांना पाणीपुरवठा करणारी ही पाइपलाइन मुख्य पाणीपुरवठा करण्याचं काम करते. गळतीमुळे संपूर्ण एच-वॉर्ड प्रभागात (वांद्रे, खार आणि सांताक्रूझ) पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. तथापि, गळती दुरुस्त झाल्यानंतरच पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा

बॉम्बे जिमखाना रोडच्या रुंदीकरणासाठी पालिकेला ग्रीन सिग्नल

५५ वर्षावरील लोकांनी कोरोनाची लक्षणं हलक्यात न घेण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

पुढील बातमी
इतर बातम्या