Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

५५ वर्षावरील लोकांनी कोरोनाची लक्षणं हलक्यात न घेण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

राज्यातील COVID 19 टास्क फोर्सनं ५५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या उच्च-जोखमच्या रुग्णांना कोरोनव्हायरसची लक्षणं हलक्यापणे न घेण्याचा सल्ला दिला आहे.

५५ वर्षावरील लोकांनी कोरोनाची लक्षणं हलक्यात न घेण्याचा टास्क फोर्सचा सल्ला
SHARES

महाराष्ट्रात COVID 19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्या दृष्टीकोनातून राज्यातील COVID 19 टास्क फोर्सनं ५५  किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या उच्च-जोखमच्या रुग्णांना कोरोनव्हायरसची लक्षणं हलक्यापणे न घेण्याचा सल्ला दिला आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले लोक उच्च जोखीम प्रकारात येतात. म्हणूनच, टास्क फोर्सची सर्वात मोठी चिंता ही अशी आहे की, लक्षणं असलेले लोक वेळेवर उपचार घेत नाहीत आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडे जाण्यास उशीर करतात.

साथीच्या आजाराच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी, अधिकारी रूग्णांना शोधून काढणे, उच्च जोखीम ओळखणे आणि मनुष्यबळ जपणे या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहेत. तथापि, रूग्णांना शोधणं हा सर्वात महत्वाचा भाग आहे. यासाठीच आरटी पीसीआर चाचणीत वाढ करण्यात आली आहे.

पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी म्हटलं आहे की, बहुतेक रुग्ण हे राजस्थान आणि गुजरातमधून आले आहेत. इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये देखील रुग्णांचा आकडा अधिक आहे.

म्हणूनच, महानगरपालिकेनं घोषणा केली की, बुधवारी, विविध रेल्वे स्थानकांवर वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या लोकांच्या चाचण्या केल्या जातील. कारण शहरात COVID 19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रवासाच्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे, कोरोनाव्हायरसच्या स्क्रिनिंगसाठी हजारो लोक रेल्वे स्थानकांवर, राज्य हद्दीत आणि विमानतळांवर लांब रांगा लावून उभे आहेत.हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा