२ ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक होणार हद्दपार...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पर्यावरणाची हानी करणारं प्लास्टिक देशातून हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारनं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्लास्टिक

बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली असून त्यानुसार २ ऑक्टोबरपासून प्लास्टिकचा वापर बंद करण्यात येणार

आहे. प्लास्टिकचा वापर करू नये, असं आवाहन याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानुसार अनेक ग्राहक आणि

दुकानदार प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्यावर भर देत आहेत.

उत्पादन बंद

मार्गदर्शक सूचनांनुसार, प्लास्टिकच्या अनेक वस्तूंचं उत्पादन बंद होऊ शकतं. सध्या प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी, कप,

चमचे, प्लेट आदींसह याशिवाय थर्माकोलच्या प्लेट, कृत्रिम फुले, बॅनर, झेंडे, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकचं फोल्डर आदींवर

बंदी घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पूर्णपणे बंद

थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचं उत्पादन, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कटलरी २ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तसंच, केंद्रानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना दिली आहे. याबाबत पर्यावरण मंत्रालयानंही या महिन्याच्या सुरुवातीला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. सरकारी कार्यालयं, खासगी कंपन्या, कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वस्तू (कृत्रिम फुले, बॅनर, फ्लॅग, फुलदाणी, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक स्टेशनरी) यांसारख्या अनेक गोष्टींचा वापर करू नये, असं म्हटलं होतं.


हेही वाचा -

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार ५०० सीएनजी बस

राज्यसभेतही असावं जातीनिहाय आरक्षण- रामदास आठवले


पुढील बातमी
इतर बातम्या