Advertisement

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार ५०० सीएनजी बस

बेस्ट समितीनं डिझेल, सीएनजीवरील बससाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले आहे.

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार ५०० सीएनजी बस
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्ट उपक्रमानं आरामदायी एसी बस सेवा देण्यासाठी बसगाड्यांच्या संख्येत वाढ करण्याच्य प्रयत्नात असतानाच बेस्ट समितीनं डिझेल, सीएनजीवरील बससाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत सीएनजीवरील ५०० बस ताफ्यात दाखल करण्याला मंजूरी दिली आहे.


५०० सीएनजी बस 

बेस्टच्या ताफ्यात नव्यानं ५०० सीएनजी बस सेवेत दाखल झाल्यानंतर सीएनजीवर चालणाऱ्या बसची संख्या २ हजारांपेक्षा अधिक होणार आहे. ही संख्या वाढताना पुरेशा प्रमाणात सीएनजीचा साठा उपलब्ध होण्यासाठी बेस्ट आगारात आणखी सीएनजी पंप उभारण्याची मागणी महानगर गॅसकडं करण्यात येणार आहे.


सीएनजी भरण्याची सुविधा

सध्या बेस्टकडे सीएनजीवरील १,८४५ बस असून, १५ आगारांत सीएनजी भरण्याची सुविधा आहे. मात्र, सीएनजीवर चालणाऱ्या बसची संख्या वाढत असताना त्याप्रमाणात सीएनजी गॅस मिळणंही गरजेचं आहे. त्यामुळं 'भाडेतत्त्वावर बस घेण्यासाठी मुंबई पालिकेकडून निधी मिळणार आहे. तेव्हा सामंजस्य करार करताना सीएनजी पंपांसंदर्भातही उपाय शोधावेत’, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.


प्रस्ताव मंजूर

सलग दोन दिवस झालेल्या बेस्ट समिती बैठकीत २ हजार २२ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत डिझेलवरील ५०० बससाठी ९५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच, मंगळवारच्या बैठकीत ५०० बससाठी १ हजार ६७ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.हेही वाचा -

वाहतुकीसाठी बंद असलेला जुहू-तारा पूल ४ महिन्यांत उभारणार

'सेल्फी विथ खड्डा', मनसे कार्यकर्त्यांची नवी मोहिमRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा