Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

वाहतुकीसाठी बंद असलेला जुहू-तारा पूल ४ महिन्यांत उभारणार

जुहू-तारा रोडवरील पूल येत्या ४ महिन्यांत उभारण्यात येणार आहे

वाहतुकीसाठी बंद असलेला जुहू-तारा पूल ४ महिन्यांत उभारणार
SHARES

सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पादचारी पुलांसह उड्डाण पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. त्यावेळी मुंबईसह उपनगरातील अनेक पूल धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये जुहू येथील एसएनडीटी कॉलेजजवळचा पूलाचा समावेश असून हा पूल २ महिन्यांपूर्वी धोकादायक म्हणून बंद करण्यात आला होता. मात्र, आता या पूलाचं दुरूस्तीचं काम करण्यात येणार आहे.

१३ कोटी रुपये खर्च 

जुहू-तारा रोडवरील पूल येत्या ४ महिन्यांत उभारण्यात येणार आहे. १८.५० मीटर लांब व ३०.३० मीटर रूंद असा हा पूल असणार आहे. तसंच, या पूलाच्या बांधकामासाठी १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पूलाच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.


वाहतुकीसाठी बंद

जुहू-तारा रोडवरील पूल २ महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हा पूल बंद असल्यानं या रोडवरून सांताक्रूझ, खार, वांद्र्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना मिठीबाई कॉलेज, नानावटी रुग्णालयामार्गे वळसा मारून जावं लागत आहे. त्यामुळं प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेत महापालिका प्रशासनाने हा पूल नव्यानं बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


जादा दरानं काम

या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजित १० कोटी ४३ लाख रुपये खर्च येणार होता. परंतु, कंत्राटदारानं तब्बल २५ टक्के जादा दरानं निविदा भरल्यानं पुलाच्या बांधकामाचा खर्च १३ कोटी ७ लाख ४३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, या पूलाचं बांधकाम होणं गरजेचं असल्यानं माहापालिकेनं जादा दरानं काम करण्याची तयारी दर्शवली आहे.


पुलाचं काम पूर्ण 

कंत्राटदाराला पावसाळ्यासह ४ महिन्यांत पुलाचं काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात कंत्राटदाराला कामाचं लेखी आदेश देऊन काम सुरू करण्यात येणार आहे. तसंच, जानेवारी २०२० मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती मिळते.हेही वाचा -

'सेल्फी विथ खड्डा', मनसे कार्यकर्त्यांची नवी मोहिम

सततच्या पावसामुळं भाजीपाला महागलाRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा