
मागील काही दिवस मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार बॅटींग केली. या मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाल्यांवर बसत आहे. सततच्या पावसामुळं भाजा्यांची आवक घटली असून भाज्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईत कांदा, भेंडी, कोथिंबिर यांसारख्या भाज्या ६० रुपये किलोच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळं मुंबईकरांना नियमित भाजीपाला विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे.
मुंबईला भाज्यांचा सर्वाधिक पुरवठा नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होतो. तसंच, बाजार समितीत प्रामुख्यानं नाशिक, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागातून भाज्यांची आवक होती. पण यंदा या सर्वच भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागल्या आहेत.
| भाजी | जुने दर | सध्याचे दर |
| भेंडी | ४० | ६० |
| फ्लॉवर | ८० | १०० |
| बटाटा | २२ | २८ |
| कांदा | ४० | ६० |
| कोथिंबिर | ४० | ६० |
| हिरव्या मिरच्या | ६० | ८० |
| कोबी | ४० | ५० |
| ढोबळी मिरची | ४० | ६० |
हेही वाचा -
मुंबई-ठाण्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
अमिताभ बच्चन यांचा मेट्रोला पाठिंबा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
