अमिताभ बच्चन यांचा मेट्रोला पाठिंबा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'आरे'मधील मेट्रो कारशेडवरून वाद सुरू असतानाच, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा दिला आहे.

SHARE

आरे कॉलनीतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडला राजकीय नेत्यांपासून सर्वच जण तिव्र विरोध करत आहेत. दिवसेंदिवस हा वाद चिघळत असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा दर्शवत या सेवेचं कौतुक केलं आहे. तसंच, अमिताभ बच्चन यांनी आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांचे अप्रत्यक्षपणं कान टोचले आहेत

मेट्रो सेवेचं कौतुक 

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ट्विटरवरून मेट्रो सेवेचं कौतुक केलं असून, मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम आणि सोयीस्कर आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एका मित्राचं उदाहरण दिलं आहे. मेडिकल इमर्जन्सीवेळी मित्रानं त्याच्या कारऐवजी मेट्रो सेवेचा पर्याय निवडला. मेट्रो सुविधा सोयीस्कर असल्याचं त्यानं परतल्यानंतर सांगितलं. खासगी वाहनापेक्षा मेट्रो सुविधा अधिक कार्यक्षम असल्याचं मित्रानं सांगितल्याचं अमिताभ यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

प्रदूषणावर उपाय

'अधिकाधिक झाडे लावा, हाच प्रदूषणावर उपाय आहे. मी माझ्या बागेत झाडे लावली आहेत. तुम्ही हे केलंत का', असा सवाल देखील अमिताभ बच्चन यांनी उपस्थित करत मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.हेही वाचा -

कंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'

गोवंडीत अल्पवयीन विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या