कंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'

अभिनेत्री कंगना रणौतनं 'मणिकर्णिका'मध्ये साकारलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाईला विविध स्तरांमधून संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री हीच व्यक्तिरेखा पुन्हा साकारताना दिसणार आहे.

SHARE

अभिनेत्री कंगना रणौतनं 'मणिकर्णिका'मध्ये साकारलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाईला विविध स्तरांमधून संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री हीच व्यक्तिरेखा पुन्हा साकारताना दिसणार आहे.

आपण सर्वजण शालेय जीवनापासून झाशीच्या राणीची ऐतिहासिक, प्रेरणादायी गोष्ट ऐकत आलो आहोत. हिच झाशीची राणी आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरफर्स्ट लुक पोस्टर सोशल मीडिया चमकणार आहे. कंगनानं 'मणिकर्णिका'च्या माध्यमातून केलेला प्रयत्न काहीसा ग्लॅमरस ठरला होता. त्यामुळंच कदाचित आणखी एक अभिनेत्री मराठीसह इंग्रजीमध्ये मराठमोळ्या राणी लक्ष्मीबाईची महती सर्वदूर पोहोचवण्यासाठी सज्ज झाली आहे. कोकणच्या पावन भूमीत जन्मलेल्या मनुनं राणी लक्ष्मीबाई बनल्यानंतर थेट झाशीपर्यंत आपल्या शौर्याची प्रचिती देत ब्रिटिशांशी दोन हात केले होते.

आता 'द मॅन हू न्यू इन्फिनीटी'च्या मेकर्सच्या वतीनं झाशीच्या राणीची शौर्यगाथा सांगणाऱ्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'द वॅारीयर आॅफ क्वीन आॅफ झांसी' असं टायटल असलेल्या या आगामी सिनेमाचं फर्स्ट लुक पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलं आहे. या सिनेमाची कथा राणी लक्ष्मीबाईंवर आधारित असून, अभिनेत्री देविका भिसेनं शीर्षक भूमिका साकारली आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन स्वाती भिसे यांनी केलं आहे. भारतामध्ये हा सिनेमा मराठीसह इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार असून, याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=ei9IkGdcmPgहेही वाचा -

‘पांडू’ उलगडणार पोलिसांचं अंतरंग

एमएक्स प्लेयरवर मोफत पहा या मराठी वेब सिरीज
संबंधित विषय
ताज्या बातम्या