Advertisement

‘पांडू’ उलगडणार पोलिसांचं अंतरंग


SHARES

आजवर पोलीसांची विविध रूपं मोठ्या आणि छोट्या पडद्याच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहेत. आता वेब सिरीजमध्ये आजवर कधीही न उलगडलेलं पोलीसांचं अंतरंग पहायला मिळणार आहे.

अभिनेता-दिग्दर्शक सारंग साठ्येनं दिग्दर्शित केलेली ‘पांडू’ ही नवी कोरी वेब सिरीज २० सप्टेंबर रोजी मॅक्स प्लेअरवर प्रसारीत होणार आहे. सारंगबाबत सांगायचं तर दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या सिनेमात त्यानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छोटीशी भूमिका साकारली होती. या सिरीजसाठी ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के यांनी पुन्हा खाकी परिधान केली आहे. त्यांच्या जोडीला अभिनेता सुहास शिरसाटसुद्धा पोलीसांच्या भूमिकेत झळकणार आहे.

मॅक्स प्लेअरवर प्रदर्शित होणाऱ्या या पहिल्या मराठी वेब सिरीजच्या निमित्तानं दीपक शिर्केंनी आपल्या ‘१००’ या गाजलेल्या मालिकेतील आठवणांना उजाळा देत ‘पांडू’बाबतच्या भावना व्यक्त केल्या. यासोबतच सारंग साठ्ये या तरुण दिग्दर्शकानं ही वेब सिरीज बनवण्यामागील खरेपणाची भावना व्यक्त केली. पोलीसांचा उल्लेख बऱ्याचदा पांडू या टोपण नावानं केला जातो. त्यामुळं या वेब सिरीजमधील ‘पांडू’ काय सांगतो ते पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा