Advertisement

एमएक्स प्लेयरवर मोफत पहा या मराठी वेब सिरीज

आजचा जमाना वेब सिरीजचा आहे. टीव्ही-सिनेमांप्रमाणं यासाठीही पैसे मोजावे लागतात, पण एमएक्स प्लेयरवर मात्र प्रथमच दोन मराठी वेब सिरीज पहायला मिळणार आहेत. त्याही अगदी मोफत...

एमएक्स प्लेयरवर मोफत पहा या मराठी वेब सिरीज
SHARES

आजचा जमाना वेब सिरीजचा आहे. टीव्ही-सिनेमांप्रमाणं यासाठीही पैसे मोजावे लागतात, पण एमएक्स प्लेयरवर मात्र प्रथमच दोन मराठी वेब सिरीज पहायला मिळणार आहेत. त्याही अगदी मोफत...


पांडू आणि वन्स अ ईअर

बाप्पाचा आशीर्वाद, चविष्ट मोदकांचा आस्वाद घेऊन आपण सगळ्यांनीच उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. इतक्या दिवसांच्या या जल्लोषमय वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर आता भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेयर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, दोन नवीन मराठी ओरिजनल्स वेब सिरीज. 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणाऱ्या या दोन्ही वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वेबसिरीज २० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेयरवर विनामूल्य बघता येणार आहेत.


धाडसी पोलिसांची कथा 

अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू' ही वेबसिरीज पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित आहे. सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के या दोन धाडसी पोलिसांची ही कथा आहे, जे आपलं शहर सुरक्षित राहावं, म्हणून सदैव तत्पर असतात. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रणही अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीनं करण्यात आलं आहे. या वेब सिरीजमध्ये पोलिसांच्या जीवनशैलीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. '१००' या गाजलेल्या मालिकेसोबतच बऱ्याच मालिका आणि सिनेमांमध्ये खाकी वर्दी परिधान केलेले ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के 'पांडू'मध्ये पुन्हा पोलिसी भूमिकेत दिसणार आहेत.


पोलिसांच्या आयुष्याचा आढावा

या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक सारंग म्हणाला की, मुंबईसारख्या मोठ्या शहराचं रक्षण करणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी प्रामाणिकपणं हे व्रत आचरणात आणावं लागतं. मुंबईचं रक्षण करण्यासाठी धाडसी आणि निडर मन असावं लागतं. आपल्या मुंबई पोलिसांमध्ये हे सर्व गुण आहेत. म्हणूनच आपण आपल्या घरात, शहरात सुरक्षित आहोत, याची जाणीव करून देण्यासाठी ही सर्व मंडळी रात्रंदिवस झटत असतात. ही कथा माझ्या खूप जवळची असण्याचं आणखी एक कारण म्हणजे यात स्त्री आणि पुरुष पोलीस खाकी वर्दी असताना आणि नसताना त्यांचं जीवन कसं असतं, याचं दर्शन घडतं. सरतेशेवटी पोलीससुद्धा तुमच्याआमच्या सारखा एक माणूसच आहे. पोलिसांच्या न पाहिलेल्या आयुष्याचा आढावा अतिशय रंजक पद्धतीनं या वेब सिरीजच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. 


प्रेमाचा प्रवास

'वन्स अ  ईअर' या वेबसिरीजमध्ये प्रेमाला मिळालेलं एक अद्भुत वळण पाहायला मिळणार आहे. मंदार कुरुंदकर दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत. सहा भागांच्या या वेब सिरीजमध्ये या दोघांच्या प्रेमाचा सहा वर्षांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या मैत्रीपासून ते प्रेमाची जाणीव होईपर्यंतचे सर्व अनमोल आणि अविधाडसी पोलिसांची कथा स्मरणीय क्षण यात बघता येतील. या वेब सिरीजच्या निमित्तानं मृण्मयी गोडबोले आणि निपुण धर्माधिकारी ही अनोखी जोडी पहायला मिळेल.


प्रेम आणि मतभेद

आजवर दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आलेला निपुण या वेब सिरीजमध्ये अभिनय करण्याच्या अनुभवाबद्दल म्हणाला की, माझा प्रेमावर खूप विश्वास आहे. या वेब सिरीजमधून आपल्याला दोन व्यक्तींच्या प्रेमाचा सहा वर्षांचा चढ-उतारांनी भरलेला प्रवास पाहायला मिळणार आहे. त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या सवयी आणि त्यांचे मतभेदसुद्धा यात पाहायला मिळतील. मला विश्वास आहे, की जी जोडपी आता प्रेमात आहेत त्या सर्वांच्या या सोनेरी काळाला नक्कीच ही वेबसिरीज जोडली जाईल.


फुलणारं प्रेम

'वन्स अ ईअर'बद्दल दिग्दर्शक मंदार कुरुंदकर म्हणाला की, कोणत्याच प्रेमकथेची सुरुवात ही पहिल्याच नजरेत होत नाही. कोणीही पहिल्याच भेटीत आपल्या शाश्वत प्रेमाची कबूली देत नाही. यासाठी काही काळ जावा लागतो. या वेबसिरीजमध्ये एका जोडप्याच्या जीवनात त्यांचं प्रेम प्रत्येक टप्यावर कसं फुलत जातं आणि अधिक मजबूत होतं, हे पाहायला मिळेल. निपुण आणि मृण्मयीसोबत काम करताना खरंच खूप मजा आली. त्यांनी त्यांच्या अभिनयानं मला खूप खुश केलं.



हेही वाचा -

स्पृहाचा 'नवा लुक' पाहिला का?

संजय जाधवच्या सिनेमात कतरीना कैफ!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा