Advertisement

स्पृहाचा 'नवा लुक' पाहिला का?

अभिनेत्री स्पृहा जोशीनं नेहमीच आपल्या अभिनयकौशल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचलेल्या या अभिनेत्रीनं पुन्हा एकदा छोट्या पडद्याचा 'ध्यास' घेतला आहे.

स्पृहाचा 'नवा लुक' पाहिला का?
SHARES

अभिनेत्री स्पृहा जोशीनं नेहमीच आपल्या अभिनयकौशल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचलेल्या या अभिनेत्रीनं पुन्हा एकदा छोट्या पडद्याचा 'ध्यास' घेतला आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'छोटे सूरवीर - सूर नवा ध्यास नवा' या लहानग्या गायकांचे कलाकारांचे कलागुण जगासमोर आणणाऱ्या रिअॅलिटी शोचं पहिलं पर्व खूपच लोकप्रिय झालं होतं. या यशानंतर या शोचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पर्वातही पहिल्या पर्वातील स्पर्धकांची लाडकी स्पृहाताई कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

आगामी पर्वाच्या आॅडीशन्स सुरू झाल्या असल्यानं स्पृहाही आपल्या चाहत्यांसमोर नव्या रूपात समोर येण्यासाठी सज्ज होत आहे. 'छोटे सूरवीर - सूर नवा ध्यास नवा'च्या दुसऱ्या पर्वाचं औचित्य साधत स्पृहानं एक नवं फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो खास 'मुंबई लाईव्ह'च्या वाचकांसाठी.

स्पृहाचं एक वेगळंच रूप या फोटोंमध्ये पहायला मिळतं. कानात फॅन्सी झुमके, कपाळावर छोटीशी टिकली, चंदेरी रंगाची किनार असलेल्या निळसर रंगाच्या साडीवर तिनं हिरव्या रंगाचं ब्लाऊज परिधान करत काहीसं अनोखं कॅाम्बिनेशन आपल्या चाहत्यांसमोर सादर केलं आहे. या ब्लाऊजला सोनेरी किनारही जोडण्यात आली आहे.

तिनं हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. असं स्पृहाचं लोभसवाणं रूप तिच्या चाहत्यांच्या संख्येत नक्कीच भर करणारं आहे. हे फोटोशूट म्हणजे केवळ झलक आहे. त्यामुळं प्रत्यक्षात 'छोटे सूरवीर - सूर नवा ध्यास नवा'च्या नव्या पर्वात स्पृहा वेगवेगळ्या लक्षवेधी कॅाम्बिनेशनसह चमकणार असल्याची ही चाहूल तर नाही ना... असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.हेही वाचा -

संजय जाधवच्या सिनेमात कतरीना कैफ!

शिव्या देण्यास अडचण नाही, पण... : मनोज वाजपेयी
संबंधित विषय
Advertisement