Advertisement

शिव्या देण्यास अडचण नाही, पण... : मनोज वाजपेयी

अॅमेझॉन प्राइम वर २० सप्टेंबरपासून त्यांची द फॅमेली मॅन नावाची वेबसिरीज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. आपल्या पहिल्या वेब सिरीजच्या प्रमोशन दरम्यान मनोज वायपेयीनं मुंबई लाइव्हशी खास बातचित केली.

शिव्या देण्यास अडचण नाही, पण...  : मनोज वाजपेयी
SHARES

सत्या चित्रपटानंतर मनोज वाजपेयीला खरी ओळख मिळाली. आज त्यानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सत्यानंतर शूल, राजनिती, गँग्स ऑफ वासेपूर आणि अलीगढ सारख्या चित्रपटात मनोज वाजपेयीनं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मनोज वाजपेयीला दोन वेळा नॅशनल अॅवॉर्ड आणि पद्मश्री सारख्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 

टीव्ही, चित्रपट आणि शॉर्ट फिल्ममध्ये अभिनयाची जादू दाखवल्यानंतर मनोज वाजपेयी वेब सिरीजच्या जगात पाऊल ठेवत आहे. अॅमेझॉन प्राइमवर २० सप्टेंबरपासून त्यांची द फॅमिली मॅन नावाची वेबसिरीज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. आपल्या पहिल्या वेब सिरीजच्या प्रमोशनदरम्यान मनोज वायपेयीनं मुंबई लाइव्हशी खास बातचीत केली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपट, वेब सिरीज याखेरीज आपल्या वैयक्तिक आयुष्यावर देखील गप्पा मारल्या.  

View this post on Instagram

Har taraf nazar rakhna zaruri hai #TheFamilyMan, stream all episodes on Sep 20! @primevideoin @familymanamazon

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj) on


  • द फॅमेली मॅन ही वेब सिरीज करण्यामागे नेमकं काय कारण आहे?

अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स हे आपल्या इथं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहेत. अॅमेझॉन नेटवर्कचं जाळं २०० देशांपर्यंत पोहचलेलं आहे. त्यामुळे याचा फायदा द फॅमिली मॅनला देखील होईल. साहजिकच द फॅमिली मॅन हा कार्यक्रम २०० देशांपर्यंत पोहोचेल. नुकतंच मी लॉस अँजलसला गेलो होतो. तिकडच्या पत्रकारांसमोर मला द फॅमिली मॅन या वेब सिरीज प्रेजेंट करण्याची संधी मिळाली. अॅमेझॉन याला एका इंटरनॅशनल सिरीजसारखं प्रमोट करत आहे. त्यामुळे याची स्क्रिप्ट किती चांगली असेल किंवा किती चांगली ही वेबसिरीज तयार करण्यात आली आहे हे तुम्ही समजू शकता.

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या चढत्या आलेखात भागिदारी असणाऱ्या वेब सिरीजमध्ये काम करायचं मी आधीच ठरवलं होतं. द फॅमिली मॅन त्या लेवलची सिरीज आहे. या वेब सिरीजची कहाणी एका स्पायची नाही तर सर्वसामान्य माणसाची आहे. काम आणि घर या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन ठेवणं किती कठिण असतं हे यातून दाखवण्यात आलं आहे. यात तुम्हाला फॅमिली ड्रामासोबतच अॅक्शनही पाहायला मिळणार आहे. एकिकडे देशाला वाचवायची जबाबदारी आणि दुसरीकडे फॅमिलीची कर्तव्य या दुहेरी भूमिका निभावताना होणारी माझी तारांबळ यात पाहता येईल

  • फॅमेली मॅन आणि स्पायची भूमिका साकारणं किती कठिण होतं?

मला वाटतं की या वेबसिरीजच्या या दोन जमेच्या बाजू आहेत. सामान्य गोष्टी करणारा एखादा व्यक्ती दुसऱ्याच क्षणी असाधारण वाटणाऱ्या गोष्टी करतो. देशासाठी तो स्पाय असला तरी घरी गेल्यावर तो एक नवरा, वडील आणि मित्र देखील आहे. तसं बघायला गेलं तर मी एक-दोन नाही तर अनेक भूमिका साकारत आहे. हे कठिण होतं यात काही शंका नाही. पण सराव आणि मेहनतीच्या जोरावर मी ते शक्य करून दाखवलं.

  • इंडस्ट्रीमध्ये बदल झाल्याचं तुम्हाला जाणवतं का? आज कुठल्याही कलाकाराला काम मिळणं खूप सोपं झालं आहे का?

नक्कीच... इंडस्ट्रीत खूप बदल झाला आहे. आपलं टॅलेंट दाखवायला आज अनेक व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत. तुमच्याकडे टॅलेंट आहे मग तुम्ही उपाशी पोटी कधीच झोपणार नाही. आमच्या वेळी परिस्थिती याच्या अगदी उलट होती. ऑडिशनबद्दल आम्हाला काही माहितच नसायचं. ऑडिशन दिलं तरी खाण्या-पिण्याचे आणि राहण्याचे हालच असायचे. कधी कधी तर प्रवासासाठीही पैसे नसायचे. हल्ली खूप सोयीस्कर झालं आहे.

  • आत्मचरित्र लिहिण्याचा काही विचार आहे का?

मला मोठ्या -मोठ्या पुस्तक प्रकाशन करणाऱ्या कंपनींकडून फोन येतात. पण मी त्यादिवशी आत्मचरित्र लिहिन ज्यादिवशी मी स्वत:ला महान समजणं सोडून देईन. माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते सांगण्यासाठी साहस पाहिजे. ज्यामध्ये काही खोटं नसेल. तेव्हा मी माझं आत्मचरित्र नक्की लिहीन.

  • आतापर्यंत लिहिलेल्या आत्मचरित्रांमध्ये खोटं बोललं जातं असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

मी कुणा दुसऱ्याबद्दल बोलत नाही. मी स्वत:बद्दल बोलत आहे. मला फक्त एवढंच वाटतं की, आत्मचरित्रात लिहिलेलं सर्व काही खरं असलं पाहिजे. उगाच काही वाढवून-चढवून लिहलं असेल तर अशा आत्मचरित्राचा काही अर्थ नाही.

View this post on Instagram

https://twitter.com/indiawest/status/1165035320263368705?s=21 @rajndk @suparnverma @mrfilmistaani @castingchhabra @samantha Prabhu

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj) on


  • आयुष्यात घडलेल्या कोणत्या घटनांना तुम्ही आत्मचरित्रात स्थान देऊ इच्छित नाहीत?

आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कुणाशी शेअर करत नाही. मला शेअर करायच्या असतील तर त्या मी आत्मचरित्रात लिहिनच. आता का तुमच्यासोबत शेअर करू.


  • बहुतांश वेब सिरीजमध्ये शिव्या आणि सेक्स सीन्सचा भडिमार असतो? तुमचा याकडं बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे?

मला शिव्या द्यायला काही अडचण नाही. पण माझ्यामते कुठल्याही गोष्टीचा वापर जबाबदारीनं केला पाहिजे. जिथे गरज आहे तिथे योग्य प्रमाणात त्याचा वापर करणं आवश्यक आहे. पण गरज नसेल तर त्याचा वापर करायची गरजच नाही. आता द फॅमिली मॅन या वेब सिरीजमध्ये शिव्यांचा जास्त भडीमार नाही. फक्त मी एक छोटीशी शिवी दिली आहे.हेही वाचा

... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना

ही ‘शकुंतला देवी’ तुम्हाला नक्कीच आवडेल!


संबंधित विषय
Advertisement