ही ‘शकुंतला देवी’ तुम्हाला नक्कीच आवडेल!

अभिनेत्री विद्या बालन लवकरच पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तिच्या चाहत्यांना ती शकुंतला देवीच्या रूपात भेटणार आहे.

SHARE

अभिनेत्री विद्या बालन लवकरच पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तिच्या चाहत्यांना ती शकुंतला देवीच्या रूपात भेटणार आहे.

विद्यानं नेहमीच ग्लॅमरस भूमिकांइतकाच चरीत्र भूमिकांनाही अचूक न्याय दिला आहे. त्यामुळंच तिनं ‘द डर्टी पिक्चर’मध्ये साकारलेली सिल्कही स्मरणात आहे आणि ‘कहानी’मधील विद्या बागचीही… मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मंगल’मध्ये तिनं वठवलेली वैज्ञानिक तारा शिंदेही लक्षवेधी ठरली आहे. हिच विद्या आता शकुंतला देवीच्या रूपात आपल्या चाहत्यांना दर्शन देणार आहे.

विद्याची शीर्षक भूमिका असलेल्या ‘शकुंतला देवी’ या आगामी हिंदी सिनेमाचं फर्स्ट लुक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टर पाहिल्यावर ही शकुंतला देवी नेमकी कशी असेल याबाबत कुतूहल निर्माण होतं. खरं तर हा बायोपीक आहे. मॅथॅमॅटीकल जिनीयस असलेल्या तसंच ‘ह्युमन काम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या कारकिर्दीवर आधारीत आहे. दिग्दर्शिका अनु मेनन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे.

शूटिंग सुरू झाल्याचं औचित्य साधत सोशल मीडियावर ‘शकुंतला देवी’चं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ज्यात पुन्हा एकदा साडी परिधान केलेली विद्या दिसते, पण काहीशी हटके हेअर स्टाईल आणि घटवलेलं वजन असं विद्याचं रूप यात पहायला मिळतं. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडीया प्रा.लि.ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या टायटलसोबत ह्युमन काम्प्युटर अशी टॅगलाईनही जोडण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये पहिल्या स्थानावर विद्या म्हणजेच शकुंतला देवी आहेत, तर दुसऱ्या स्थानी संगणक आणि तिसऱ्यावर कॅल्क्युलेटर आहे. शकुंतला यांनी संगणक आणि कॅल्क्युलेटवर मात केल्याचं या पोस्टरच्या माध्यमातून सुचवण्यात आलं आहे. हा सिनेमा पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

या कलाकारांनी बांधल्या ‘साता जल्माच्या गाठी’

... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना
संबंधित विषय
ताज्या बातम्या