Advertisement

... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना

आयुषमान ड्रीम गर्ल या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येणार आहे. या चित्रपटात आयुषमान पूजा हे स्त्री पात्र साकारणार आहे. ड्रीम गर्ल चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आयुषमाननं 'मुंबई लाइव्ह'शी खास बातचित केली.

... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना
SHARES

नॅशनल अॅवॉर्ड विजेता आयुषमान खुरानानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात विकी डोनर या चित्रपटाद्वारे केली होती. चित्रपटाचा विषय हटके होता. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलीच पसंती दिली होती. या चित्रपटानंतर आयुषमाननं एकाहून एक जबरदस्त चित्रपट केले. या चित्रपटांमध्ये 'दम लगा के हइशा’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’, ‘बधाई हो’ और ‘आर्टिकल 15’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांमुळे आयुषमाननं प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख  निर्माण केली आहे. आता आयुषमान ड्रीम गर्ल या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येणार आहे. या चित्रपटात आयुषमान पूजा हे स्त्री पात्र साकारणार आहे. ड्रीम गर्ल चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आयुषमाननं 'मुंबई लाइव्ह'शी खास बातचित केली.

नॅशनल अॅवॉर्ड विजेता म्हणून आयुषमान खुरानाकडे पाहिलं जातं. यामुळे तुझ्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत? त्यामुळे तुझी जबाबदारी वाढली आहे का?

कोणताही चित्रपट करण्याआधी किंवा निवडण्यापूर्वी हे माहित नसतं की तुम्हाला त्यासाठी नॅशनल अॅवॉर्डनं सन्मानित केलं जाईल. पण जेव्हा तुम्हाला हा सन्मान मिळतो तेव्हा खूप आनंद होतो. एक प्रेरणा मिळते. तुम्ही चित्रपटाच्या ज्या स्क्रिप्ट निवडत आहात या योग्य असल्याची खात्री होते. चित्रपटाचा दिग्दर्शक किंवा निर्माता कोण आहे? हे मी कधीच बघत नाही. मला फक्त एक उत्तम स्क्रिप्ट हवी आहे.

हल्ली चित्रपटांचे सिक्वेल बनवले जातात? या सिक्वेलबद्दल तुमचं काय मत आहे?

मला तरी कुठल्या चित्रपटाचा सिक्वेल एवढा आवडत नाही आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण चित्रपटाच्या पहिल्या भागातच तुम्ही सर्व स्टोरी सांगितलेली असते. काही तरी वेगळं करण्यावर माझा अधिक भर असतो. शुभ मंगल सावधान चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाची कथा वेगळी होती. शुभ मंगल सावधानचा  पहिल्या भाग इरेक्टाइल डिसफंक्शन या समस्येवर आधारी होता. तर त्याच्या सिक्वेलची कहाणी गे लव स्टोरीवर आधारीत होती. त्यामुळे मी शुभ मंगल सावधानचा सिक्वेल केला होता. कोणतीही स्टोरी विनाकरण ताणण्यात काही मजा नाही. एका फ्रेश स्टोरीत वेगळीच मजा असते.

जीतेंद्र यांच्यासोबत मुलाखत कशी होती? त्यांच्याकडून काय शिकलास?

जीतू यांना मी जुहूतल्या एका क्लबमध्ये भेटलो होतो. आमच्या गाड्या सेम होत्या. त्यामुळे ते चुकून माझ्या गाडीत बसले होतेमग मीच त्यांना घरपर्यंत सोडलं. क्लब ते घरापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मला एक सल्ला दिला. ते म्हणाले की, आयुष्यात चांगल्या स्क्रिप्टच निवड. स्क्रिप्ट चांगली असेल तर एक चांगला कलाकार म्हणून तू प्रेक्षकांच्या समोर येशील. स्क्रिप्ट चांगली नसेल तर तू कितीही चांगलं काम कर ते प्रेक्षकांचं मन जिंकू नाही शकणार. एका चांगल्या स्क्रिप्टवरच अभिनेता चांगला की वाईट ठरवलं जातं. जीतू सरांनी दिलेला सल्ला मी नेहमीच लक्षात ठेवीन.

तुम्ही बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे तुमचा एखादा चित्रपट चालला नाही तर याचा तुमच्यावर काही परिणाम होईल असं मला वाटतं नाही.

असं नाही. एखादा चित्रपट चालला नाही तर कुठल्याही अभिनेत्याला हे आवडणार नाही. तो भले कितीही फेमस का असेना. एका चित्रपटामागे फक्त अभिनेत्याची नाही तर अनेकांची मेहनत असते. त्यामुळे अर्थात वाईट वाटतंच. माझा आगामी येणारा चित्रपट ड्रिम गर्लकडून मला खूप अपेक्षा आहेत. मी गोविंदा सरांना डोळ्यासमोर ठेऊन यातली भूमिका साकारली आहे. मी त्यांचा आंटी नंबर १ हा चित्रपट पाहिला आहे.

चित्रपटात एका महिलेचा आवाज तुम्ही काढला आहे. पण तुम्ही महिलांच्या भावनांना किती समजून घेता?

मला असं वाटतं की, महिलांबाबत एखादं मत तयार करणं किंवा त्यांना एका ठराविक साच्यातून पाहणं, हे थोडं कठिण आहे. त्या तुलनेत पुरुषांना आपण चटकन ओळखू शकतो. किंवा एखाद्या साच्यात बसवू शकतो. प्रत्येक स्त्री वेगळी असते. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. पण पुरुषांचं तसं नसतं. तो बऱ्याचदा एकाच प्रकारे विचार करतो.



हेही वाचा

प्रियंका आणि फरहानला महाराष्ट्र पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Movie Review: कायद्याच्या तराजूतील न्यायनिवाडा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा