प्रियंका आणि फरहानला महाराष्ट्र पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

'स्काय इज पिंक' ट्रेरला प्रेक्षकांकडून चांगली पसंती देखील मिळाली. पण या चित्रपटाच्या एका डायलॉगवरून सध्या ती महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर आली आहे.

SHARE

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियंका चोप्रा शोनाली बोस दिग्दर्शित द स्काय इज पिंक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर झळकणार आहेनुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झालाट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगली पसंती देखील मिळालीपण या चित्रपटाच्या एका डायलॉगवरून सध्या ती महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर आली आहेएवढं टेंशन घेऊ नकाप्रियंकाला पोलिसांनी पकडलं वगैरे नाही. तर चित्रपटातील डायलॉगवरून ट्विट करत तिची फिरकी घेतली आहे

'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या ट्रेलरमधला फरहानसोबतच्या एका डायलॉगवरून पोलिसांनी प्रियंकाची टर खेचली आहे. एक बार आयशा ठिक होने दो फिर हम दोनो बँक लुटेंगे, असा प्रियंकाचा डायलॉग आहे. महाराष्ट्र पोलिसांनी प्रियंकाच्या डायलॉगसहित एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोसोबत कॅप्शन देखील दिलं आहे. या कृत्यासाठी तुम्हाला कलम ३९३ नुसार दंड आणि ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या या मजेशीर ट्वीटला प्रियंकानं देखील उत्तर दिलं आहे. उप्स, आम्ही रंगेहाथ पकडले गेलो. आता प्लॅन बी अॅक्टीव्हेट करण्याची वेळ आली आहे. असं प्रियंकानं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर दिलं आहे. आता या सर्व मॅटरमध्ये फरहान खाननं देखील उडी मारली आहे. त्यानं ट्वीट केलं आहे की, आता पुन्हा कॅमेऱ्यासमोर चोरी करायची योजना करणार नाही.

शोनाली बोस दिग्दर्शित स्काय इज पिंक ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. जय गंगाजल या चित्रपटानंतर जवळपास ३ वर्षांनंतर प्रियंका बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. त्यामुळे तिचे चाहते या चित्रपटासाठी फार उत्साही आहेतहेही वाचा

'स्वागत तो करो हमारा' म्हणत परतला चुलबुल पांडे

'सॅक्रेड गेम्स'च्या कलाकारांना डिजीटल विश्वात सर्वाधिक पसंती


संबंधित विषय
ताज्या बातम्या