Advertisement

'सॅक्रेड गेम्स'च्या कलाकारांना डिजीटल विश्वात सर्वाधिक पसंती

अमेरिका स्थित मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने सॅक्रेड गेम्सच्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची एक लिस्ट नुकतीच प्रकाशित केली आहे.

'सॅक्रेड गेम्स'च्या कलाकारांना डिजीटल विश्वात सर्वाधिक पसंती
SHARES

'सॅक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. या वेबसीरिजमधील व्यक्तिरेखा आणि त्यांचे संवादसुध्दा काही लोकांच्या पसंतीस उतरले. काही संवाद तर प्रेक्षकांना मुखोद्गतच झाले. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे या दोन भूमिकांसोबतच 'सॅक्रेड गेम्स'च्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वातल्या इतरही भूमिकांना आणि त्या निभावणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली.

लोकप्रियतेची लिस्ट प्रकाशित 

अमेरिका स्थित मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने सॅक्रेड गेम्सच्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची एक लिस्ट नुकतीच प्रकाशित केली आहे. त्यानुसार, सरताजच्या भूमिकेत दिसलेल्या सैफ अली खानच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सचं दुसरं पर्व रिलीज झाल्यानंतरच्या आठवड्यात (१५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट) ७८ गुणांवरून १०० गुणांपर्यंत वाढ झालेली दिसून आली. ज्यामुळं सैफ अली खान लोकप्रियतेत प्रथम क्रमांकावर पोहोचला. गणेश गायतोंडे बनलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचीही लोकप्रियता ५५ गुणांवरून ५९ गुणांपर्यंत पोहोचली. ज्यामुळं नवाज लोकप्रियतेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कल्कि तिसऱ्या स्थानावर

बात्या एबेलमॅन बनलेली कल्कि कोचलिन लोकप्रियतेत तिसऱ्या स्थानावर आहे. सुरूवातीला ३९ गुणांवर असलेली कल्की लोकप्रियतेत ४७ गुणांवर पोहोचली आहे. पूर्व आयएसआय प्रमुख शाहिद खानच्या खतरनाक भूमिकेत अभिनेता रणवीर शौरी होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्यानं तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.  सीझन २ मधल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या गुरुजींच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता पंकज त्रिपाठी पाचव्या स्थानावर आहे. तर पहिल्या पर्वात दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या सिझननंतर दुसऱ्या पर्वातही राधिका असेल का, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळंच सॅक्रेड गेम्स रिलीज झाला त्या आठवड्यात आणि त्यानंतर राधिकाच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आली.  

फॅन फॉलोविंग

सुरवीन चावला उर्फ जोजो, अमृता सुभाष उर्फ  केडी यादव मॅडम, एलनाज़ नौरोज़ी उर्फ जोया मिर्ज़ा आणि ल्यूक केनी उर्फ मलकोम या कलाकारांनांही सॅक्रेड गेम्सच्या रिलीजनंतर चांगलीच प्रसिध्दी मिळाली. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या सहा अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सच्या रिलीजच्या सुमारास चांगलीच वाढ झालेली दिसून आली. सॅक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझननंतर दुसऱ्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळंच ऑगस्ट महिन्यात या कलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आली. सोशल, व्हायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूज़पेपर्समध्ये या कलाकारांची चांगलीच फॅन फॉलोविंग दिसून आली.



हेही वाचा  -

गणपती-गौरीसोबतचा 'पवित्र रिश्ता'

नेहा-पुष्कराजचा 'मीडियम स्पाइसी'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा