नेहा-पुष्कराजचा 'मीडियम स्पाइसी'

अभिनेत्री नेहा जोशीनं मराठीपासून हिंदीपर्यंत लहानसहान भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. यासोबतच पुष्कराज चिरपुटकरनं छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • नेहा-पुष्कराजचा 'मीडियम स्पाइसी'
SHARE

अभिनेत्री नेहा जोशीनं मराठीपासून हिंदीपर्यंत लहानसहान भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. यासोबतच पुष्कराज चिरपुटकरनं छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता हे दोघे एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.


कलाकारांची मांदियाळी 

शहरी नातेसंबंधांभोवती गुंफण्यात आलेल्या 'मीडियम स्पाइसी' या चित्रपटाच्या निमित्तानं बरेच प्रतिभावंत कलाकार एकत्र आले आहेत. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिकांसह सागर देशमुख, नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या सहाय्यक भूमिका असलेला 'मीडियम स्पाइसी' या वर्षीचा कलाकारांची मांदियाळी असणारा चित्रपट ठरणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटात नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर दिसणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. 


अभिनयाची जुगलबंदी

मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि विधी कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'मीडियम स्पाइसी' चित्रपटाचा प्रवास नावाप्रमाणेच लज्जतदार असून, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे. नेहा जोशीबाबत बोलायचं तर ती मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. 'फर्जंद', 'झेंडा', 'पोस्टर बॉईज' या चित्रपटांमधून तिनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून, मागील वर्षी तिला 'नशीबवान'साठी राज्य पुरस्कारामध्ये उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसंच अभिनेता पुष्कराज चिरपुटकरला 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतील आशूच्या भूमिकेसाठी रसिकांचं प्रेम मिळालं, याच भूमिकेसाठी त्याला २०१५ मध्ये झी मराठी अवार्ड मिळाला आहे. काही यशस्वी चित्रपटांमध्ये त्यानं वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असून, 'मंत्र' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला राज्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होतं. आता 'मीडियम स्पाइसी'च्या निमित्तानं या दोन कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळणार आहे.



हेही वाचा -

सलील कुलकर्णी सांगणार 'एकदा काय झालं'

लालबागच्या राजा चरणी प्रथमेशचा 'डॅाक्टर डॅाक्टर'




संबंधित विषय
ताज्या बातम्या