Advertisement

लालबागच्या राजा चरणी प्रथमेशचा 'डॅाक्टर डॅाक्टर'

यंदा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सामील झालेल्या 'टकाटक' या मराठी चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या आगामी चित्रपटाचा श्रीगणेशा लालबागच्या राजाच्या चरणी विनम्र होत केला.

लालबागच्या राजा चरणी प्रथमेशचा 'डॅाक्टर डॅाक्टर'
SHARES

यंदा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सामील झालेल्या 'टकाटक' या मराठी चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या आगामी चित्रपटाचा श्रीगणेशा लालबागच्या राजाच्या चरणी विनम्र होत केला.

चरणी नतमस्तक

प्रथमेश परबनं 'टाईमपास'मध्ये साकारलेला दगडू जसा सर्वांच्याच स्मरणात राहिला, तसाच 'टकाटक'मध्ये सादर केलेल्या ठोक्यानंही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रथमेशची ऋतिका श्रोतीसोबतची आणि प्रणाली भालेरावची अभिजीत आमकरसोबतची केमिस्ट्री वर्क झाल्यानं 'टकाटक'नं बॅाक्स आॅफिसवरही चांगला गल्ला जमवण्यात यश मिळवलं. आता प्रथमेश आपल्या आगामी मराठी चित्रपटाकडं वळला आहे. या सिनेमाचा मुहूर्त करत तो लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाला.

डॉक्टर डॉक्टर

'डॉक्टर डॉक्टर' असं शीर्षक असलेल्या आगामी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह प्रथमेशनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. याप्रसंगी प्रथमेशसह पार्थ भालेराव, निर्माता-अभिनेता अमोल कागणे आणि मंडळी उपस्थित होती. 'डॉक्टर डॉक्टर' या शीर्षकावरून तरी या चित्रपटाचं कथानक डॅाक्टर आणि त्यांच्या अवतीभवती गुंफण्यात आल्याचं जाणवतं, पण चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल ते अद्याप तरी सांगण्यात आलेलं नाही.हेही वाचा -

'मोलकरीण बाई'नं धो धो पावसावर केली मात

डिजिटल युगात कलाकाराची गुंतागुंत- हॅरी आनंद
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा