Advertisement

डिजिटल युगात कलाकाराची गुंतागुंत- हॅरी आनंद


डिजिटल युगात कलाकाराची गुंतागुंत- हॅरी आनंद
SHARES

१९९९ मध्ये ‘सुबह आते ही जैसे’ अल्बममधून आपल्या गायनाच्या कारकिर्दीला सुरूवात करणारे संगीत दिग्दर्शक आणि लेखक हॅरी आनंद यांचे ‘सजना है मुझे’, ‘जाने तेरी चाहत में’, ‘चढ़ती जवानी’ सारखे अल्बम चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्याशिवाय त्यांनी ‘जानी दुश्मन’, ‘यह है मोहब्बत’, ‘बिच्छु’ या हिंदी सिनेमांनादेखील म्युजिक दिलं आहे. हॅरी आनंद यांच्यासाठी राहत फतेह अली खान यांच्यासह अंकित तिवारी, अरमान मलिक, नेहा कक्कर, सुखविंदर सिंह, सुनिधि चौहान आणि सोनू निगम या संगीतकारांनी गाण गायलं आहे. त्यांचं ‘तू आया ना’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं पुलावामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांवर आधारित आहे.

‘तू आया ना’ कोणाची कल्पना आणि याची सुरुवात कशी झाली?

एखाद्या संगीतकाराकडे गाण्यांचा साठा असतो. मोकळ्या वेळेत आम्ही एक चाल बनवतो, तर काही लिहितो. तसंच, माझ्याकडे ‘हरेक बूंद बारिश की, तेरी याद दिलाए’ च्या काही ओळी होत्या. 'मी मुंबईत गेल्या २० वर्षांपासून रहात आहे, माझ्याप्रमाणेच मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असंख्य लोक आहेत', या संकल्पनेवर आधारित मी याआधी काही गाणी लिहिली होती. त्यावेळी मी सुमित्रा (संगीतकार, सुमित्रा देव बर्मन) यांची भेट घेतली होती. सुमित्रा यांना मी याबाबत सांगितलं आणि त्यांनी ज्यावेळी हे गाण गायलं तेव्हा मी हे गाणं रिलिज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘तू आया ना’ गाण्याला गणेश आचार्य यांची साथ मिळाली असून, हे गाणं जवानांवर आधारित असलं पाहिजे अशी त्यांची संकल्पना होती.

यापूर्वी कृष्णा अभिषेक यांना गंभीर भूमिकेत पाहिले नव्हतं, गाण्यात त्यांना घ्यायचा विचार कोणाचा?

कृष्णा माझे चांगले मित्र आहेत. परंतु मी सुद्धा त्यांनी गंभीर भूमिका केल्याचं कमी वेळा पहिलं आहे. आम्ही बऱ्याचदा एकत्र डिनर केला आहे. मात्र त्यांना मी कधी गंभीर झालेलं पाहिलं नाही. त्यांना या गाण्यात घेण्याची कल्पना मास्टर जी (गणेश आचार्य) यांची होती. त्यांच्या मते कृष्णा चांगलेच लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांनी त्यांना गंभीर भूमिकेत कधीही पाहिलेलं नाही. तेव्हा त्यांना वेगळ्या भूमिकेत पाहता येईल.


मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धूम आहे, तुमची गणपती बाप्पावर किती श्रद्धा आहे?

माझ्या प्रत्येक कामाची सुरूवात गणपती बाप्पाच्या पूजेनं होते. गणपती बाप्पा शुभ लाभचे प्रतीक आहेत. मी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. तसंच, इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेशही देतो. जर आपण पर्यावरणाच्या दृष्टीनं जागृत नाही झालो, तर येत्या २० वर्षात परिस्थिती बिकट होईल. श्वास घेणं कठीण होईल, समुद्राचं पाणीही खराब होईल. आपल्या देशात शिक्षित आणि अशिक्षित असे दोन वर्ग आहेत. जे अशिक्षित आहे, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे आणि त्यांना पर्यावरणाच्या दृष्टीनं जागरूक केलं पाहिजे. हे काम सोशल मीडियाद्वारे होणार नसून, आपल्याला तिथं जाऊन त्यांना समजवावं लागणार आहे. 

डिजिटलनं पायरसी वाढली आहे काय वाटतं? कलाकारांवर याचा काय फरक पडला आहे?

पायरसी ही एक अशी गोष्ट आहे, जी पूर्णपणे थांबवणं कठीण आहे. यामुळं कुठेना कुठे कॉपी राईटच्या नियमांच उल्लंघन होतं आहे. सध्याच्या काळात पाहिलं तर कलाकाराला काय चाललं आहे, याबाबत काहीच कळत नाही. एक संगीतकार गाणं बनवतो आणि हे गाणं पुढच्या एक-दोन तसांत जगभरात प्रसिद्ध होतं. त्याला मिलिअन व्ह्यूज  मिळतात. एक नवीन संगीतकार एका दिवसात प्रसिद्ध होतो आणि जे वर्षानुवर्षे गात आहेत, ज्यांना राष्ट्रपती पूरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. ते ५ हजार व्ह्यूजवर थांबले आहेत. मी श्रोत्यांनी एक सांगू इच्छितो की एखाद्या कलाकाराला व्ह्यूजवरून योग्य की अयोग्य ठरवू नका, ही पाश्चिमात्य देशातून आलेली गोष्ट आहे. याचा यूट्यूबनं शोध लावला असून, हे आज नाही तर उद्या गेलं पाहिजे. अन्यथा १०० टक्के भविष्यकाळ अंधारात आहे. सुखविंदर यांच्यासारख्या महान संगीतकाराचे १ लाख देखील व्ह्यूज नाहीत.

एकेकाळी बॉलिवूडमध्ये सेमी क्लासिकल मोठ्या प्रमाणातं होतं मात्र आता नाही, पुन्हा एकदा त्याला झळाळी द्यायचा विचार तुम्ही कसा केला?  

एखाद्या गाण्याचे बीट खूप महत्वपूर्ण असतात. तसंच, या गाण्याच्या बीट्सही लाइट आहेत. पण जेव्हा देशभक्ती येते तेव्हा ती पुन्हा वाढते. सुमित्रा यांच्या आवाजात जादू असून, त्यांनीच आम्हाला सेमी क्लासिकलच्या दिशेनं पुढे जाण्यास प्रोत्साहन दिलं.

तुमच्या आगामी प्रकल्पाबाबत काय सांगाल?

 मिस वर्ल्ड आणि मिस यूनिवर्स इंडिया स्पर्धेसाठी मी नुकतंच एक गाणं गायलं आहे. एका गाण्यात मिस इंडिया देखील येत आहे. मी आता त्यांच नाव नाही घेऊ शकत. टी सीरीजसाठी मी आधीच दोन गाणी दिली आहेत, ती फक्त अपलोड व्हायची आहेत. यामध्ये यूकेचे कलाकार रोमा आणि एच धामी यांचा सहभाग आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement