'मोलकरीण बाई'नं धो धो पावसावर केली मात

शहरी तसंच ग्रामीण महाराष्ट्रालाही यंदा जोरदार पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. याला मनोरंजन इंडस्ट्रीही अपवाद नाही. सध्या छोट्या पडद्यावर लक्ष वेधून घेणाऱ्या 'मोलकरीण बाई' या मालिकेनं पावसावर मात करत शूटिंग पूर्ण केलं आहे.

  • 'मोलकरीण बाई'नं धो धो पावसावर केली मात
  • 'मोलकरीण बाई'नं धो धो पावसावर केली मात
  • 'मोलकरीण बाई'नं धो धो पावसावर केली मात
SHARE

शहरी तसंच ग्रामीण महाराष्ट्रालाही यंदा जोरदार पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. याला मनोरंजन इंडस्ट्रीही अपवाद नाही. सध्या छोट्या पडद्यावर लक्ष वेधून घेणाऱ्या 'मोलकरीण बाई' या मालिकेनं पावसावर मात करत शूटिंग पूर्ण केलं आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वरुणराजा जोरदार बरसत आहे. अतिवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं मुंबईकरांचे हाल झाले आहेत. कितीही पाऊस झाला, जनजीवन विस्कळीत झालं तरी मुंबई थांबत नाही. मुंबईकरांचं स्पिरिट त्यांना थांबू देत नाही. स्टार प्रवाहवरील 'मोलकरीण बाई'च्या टीमच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं. 'मोलकरीण बाई'च्या संपूर्ण टीमनं 'शो मस्ट गो आॅन' म्हणत धो धो पावसात शूटिंग पार पाडलं.

'मोलकरीण बाई' मालिकेत गणपती विसर्जनाचा भाग चित्रित करण्याचं ठरलं होतं. त्यासाठी ठाण्यामध्ये बाप्पाच्या विसर्जनाचा सिक्वेन्स शूट होणार होता. तुफान पावसामुळं चित्रिकरणात बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. 'मोलकरीण बाई'च्या संपूर्ण टीमनं पावसाचं आव्हान स्वीकारत धो धो पावसात चित्रीकरण पूर्ण केलं. गणपती विसर्जनाचं शूटिंग आणि त्यात दुर्गाबाई म्हणजेच उषा नाडकर्णी यांच्या अपहरणाचा सीन शूट होत असल्यामुळं संपूर्ण टीमवर मोठी जबाबदारी होती. रिअल लोकेशनवर शूट होत असल्यामुळं प्रेक्षकांची गर्दीही जमली होती. मात्र कोणतीही तक्रार न करता 'मोलकरीण बाई'च्या संपूर्ण टीमनं जिद्दीनं आणि चिकाटीनं हा सीन उत्तमरित्या पूर्ण केला.

मोलकरीण बाई' मालिकेत अनिताची भूमिका साकारणारी सारिका नवाथे शूटिंगच्या रोमांचक अनुभवाविषयी म्हणाली की, खूपच वेगळा अनुभव होता. पावसाचा अंदाज घेऊन लवकरच सेटवर पोहोचलो. मात्र पावसाचा जोर वाढतच गेला. शूटिंग रखडलं होतं. फावल्या वेळात आम्ही अंताक्षरीचा डाव खेळत सेटवर मैफल जमवली. मात्र शूटिंग पूर्ण करणं महत्त्वाचं होतं, त्यामुळं थोडा धीर करत भर पावसात सीन द्यायचा ठरवलं. पावसात भिजल्यानंतर भीती कुठच्या कुठे पळून गेली. कोणतीही गोष्ट दिलखुलासपणं स्वीकारावी असं मला वाटतं. एरव्ही पावसात भिजण्याचं धैर्य होत नाही. मात्र मालिकेमुळं एक दिवस पावसात भिजण्याचा संपूर्ण टीमनंच मनमुराद आनंद लुटला.




संबंधित विषय
ताज्या बातम्या