सलील कुलकर्णी सांगणार 'एकदा काय झालं'

संगीत दिग्दर्शनाकडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलेले सलील कुलकर्णी आता आपल्या आगामी मराठी चित्रपटाकडं वळले आहेत. आता ते 'एकदा काय झालं' सांगत प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • सलील कुलकर्णी सांगणार 'एकदा काय झालं'
SHARE

संगीत दिग्दर्शनाकडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलेले सलील कुलकर्णी आता आपल्या आगामी मराठी चित्रपटाकडं वळले आहेत. आता ते 'एकदा काय झालं' सांगत प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहेत.


एकदा काय झालं

संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वेडींगचा शिनेमा' या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभल्यानं लवकरच त्यांनी दिग्दर्शित केलेला आगामी मराठी सिनेमाही रसिक दरबारी सादर होणार आहे. 'वेडींगचा शिनेमा'म्ये सलील यांनी मुक्ता बर्वेसारख्या आघाडीच्या अभिनेत्रीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या प्री वेडींग सिनेमातील गंमती जमतीवर प्रकाश टाकला होता. आता ते 'एकदा काय झालं' ते प्रेक्षकांना सांगणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचं शीर्षकच 'एकदा काय झालं' असं आहे.

पोस्टर प्रकाशित

सलील कुलकर्णी यांनी त्यांचा दुसरा मराठी चित्रपट असलेल्या 'एकदा काय झालं'चं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित केलं आहे. 'वेडिंगचा शिनेमा'नं भारतात आणि परदेशांतसुद्धा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला. या निखळ विनोदी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला झाला आणि रूढार्थानं सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले. हे यश ताजं असतानाच 'एकदा काय झालं' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मिडियावर झळकलं आणि रसिकांची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे. उत्कंठावर्धक शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याचं सर्वांनाच कुतूहल आहे.

तीन महत्त्वाच्या भूमिकेत 

गजवदन प्रॉडक्शन्स आणि शो बॉक्स एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच सलील कुलकर्णी 'एकदा काय झालं'मध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या तीन महत्त्वाच्या भूमिकेत रसिकांसमोर येणार असून, २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या टीमची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
हेही वाचा -

'मोलकरीण बाई'नं धो धो पावसावर केली मात

डिजिटल युगात कलाकाराची गुंतागुंत- हॅरी आनंद
संबंधित विषय
ताज्या बातम्या