Advertisement

गणपती-गौरीसोबतचा 'पवित्र रिश्ता'

गणपती-गौरी पूजनाच्या निमित्तानं 'पवित्र रिश्ता' मालिकेतील गर्लगँग एकत्र आली. प्रार्थना बेहरे, अंकिता लोखंडे आणि प्रिया मराठे या तीन मराठमोळ्या अभिनेत्रींनी गणेशोत्सवाचा आनंद एकत्र येत साजरा केला.

गणपती-गौरीसोबतचा 'पवित्र रिश्ता'
SHARES

गणपती-गौरी पूजनाच्या निमित्तानं 'पवित्र रिश्ता' मालिकेतील गर्लगँग एकत्र आली. प्रार्थना बेहरे, अंकिता लोखंडे आणि प्रिया मराठे या तीन मराठमोळ्या अभिनेत्रींनी गणेशोत्सवाचा आनंद एकत्र येत साजरा केला.

'पवित्र रिश्ता'मधील प्रार्थना, अंकीता आणि प्रिया यांनी हे स्पेशल मूमेंट्स कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले आहेत. तिघींनीही बाप्पांचा आशीर्वाद घेतला. भक्तीभावानं गणेशाची पूजा केली. त्यानंतर मोठ्या श्रद्धेनं महाप्रसादही ग्रहण केला. 

याप्रसंगी मराठमोळ्या संस्कृतीनुसार प्रार्थना बेहरेची खणा-नारळानं ओटीही भरण्यात आली. आज छोट्या पडद्यावरील मोठी स्टार बनलेली आणि कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका'मुळं पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेल्या अंकीता लोखंडेसोबत सेल्फी काढण्याचा मोह प्रार्थनाला आवरता आला नाही. 

याशिवाय प्रार्थनानं प्रिया आणि अंकीतासोबतही सेल्फी काढला. यंदाच्या गौरी-गणपतीच्या सणाच्या निमित्तानं जगलेले हे क्षण या तिघींसाठी अनोखा आनंद देणारे ठरले. त्यामुळं हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांचाही आनंद द्विगुणीत होईल यात शंका नाही.हेही वाचा -

नेहा-पुष्कराजचा 'मीडियम स्पाइसी'

सलील कुलकर्णी सांगणार 'एकदा काय झालं'

लालबागच्या राजा चरणी प्रथमेशचा 'डॅाक्टर डॅाक्टर'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा