Advertisement

'स्वागत तो करो हमारा' म्हणत परतला चुलबुल पांडे

सलमान खान आणि त्याच्या सिनेमातील मसालेदार संवाद प्रेक्षकांमध्ये चांगलेच पॅाप्युलर होतात. आता 'स्वागत तो करो हमारा' असं म्हणत सलमान पुन्हा आपल्या जुन्याच शैलीत प्रगटला आहे.

'स्वागत तो करो हमारा' म्हणत परतला चुलबुल पांडे
SHARES

सलमान खान आणि त्याच्या सिनेमातील मसालेदार संवाद प्रेक्षकांमध्ये चांगलेच पॅाप्युलर होतात. आता 'स्वागत तो करो हमारा' असं म्हणत सलमान पुन्हा आपल्या जुन्याच शैलीत प्रगटला आहे.

पोस्टर लाँच 

सलमान खानचा एक सिनेमा प्रदर्शित झाला की चाहत्यांना त्याच्या आगामी सिनेमाचे वेध लागतात. त्यामुळंच 'भारत'नंतर लगेचच त्याचे चाहते 'दबंग ३'ची वाट पाहू लागले आहेत. या सिनेमातील सलमानचा फर्स्ट लुक दाखवणारं पोस्टर लाँच करण्यात आल्यानं 'दबंग ३'बाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. या पोस्टरवर 'स्वागत तो करो हमारा' असं म्हणत सलमान आपल्या चुलबुल पांडे स्टाईलमध्ये परतल्याचं पहायला मिळतं. तिच चुलबुल पांडे स्टाईलची मिशी, तसाच पण काहीसा बदललेला गॅागल आणि शर्ट परिधान करून सलमान आपल्या 'दबंग' रूपात पुन्हा अवतरला आहे.

दक्षिणात्य शैलीची झलक

सलमानच्या 'दबंग' चित्रपटांच्या सिरीजमधील 'दबंग ३' हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं असल्यानं यात दक्षिणात्य शैलीची झलकही पहायला मिळणार आहे. सलमान, अरबाज खान यांच्यासोबत निखिल द्विवेदी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सुदीप, सई मांजरेकर, महेश मांजरेकर, अरबाज खान, माही गिल, टिनू आनंद, निकितीन धीर, प्रमोद खन्ना, पंकज त्रिपाठी, नवाब शाह, अभिलाष चौधरी आदी कलाकारांच्या भूमिका असून, वरीना हुसैन आणि मौनी रॅाय यांचा स्पेशल परफॅार्मंसही पहायला मिळेल.

२० डिसेंबरला रिलीज

दिलीप शुक्ला यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून, पटकथा प्रभू देवा, दिलीप शुक्ला आणि आलोक उपाध्याय यांनी लिहीली आहे. 'दबंग'च्या तिसऱ्या भागाच्या कथेला मध्य प्रदेशची पार्श्वभूमी आहे. यंदा २० डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू आणि कन्नड या दक्षिणात्य भाषांमध्येही हा सिनेमा एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं 'वाँटेड'नंतर प्रभू देवा आणि सलमान पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा सलमान आणि प्रभू देवाची धमाल प्रेक्षकांना पहायला मिळेल.



हेही वाचा -

रमाबाईंच्या भूमिकेनं अभिनेत्री म्हणून श्रीमंत केलं - शिवानी रांगोळे

नऊ कलाकार आणि सहा लोककलांनी सजलेलं 'हिरकणी'तील शिवराज्याभिषेक गीत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा