Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

नऊ कलाकार आणि सहा लोककलांनी सजलेलं 'हिरकणी'तील शिवराज्याभिषेक गीत

शिवराज्याभिषेकावर आतापर्यंत अनेक गाणी आली आहेत. मात्र, प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचं गाणं नऊ मराठी कलाकार, सहा लोककला प्रकारांनी सजलेलं आहे.

नऊ कलाकार आणि सहा लोककलांनी सजलेलं 'हिरकणी'तील शिवराज्याभिषेक गीत
SHARES

शिवराज्याभिषेकावर आतापर्यंत अनेक गाणी आली आहेत. मात्र, प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचं गाणं नऊ मराठी कलाकार, सहा लोककला प्रकारांनी सजलेलं आहे.


शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील गीत

आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्या निमित्तानं येणाऱ्या गीतांनी रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात आलं आहे. याच धर्तीवर आणखी एक लक्षवेधी गीत रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे. अभिनेता प्रसाद ओकच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'हिरकणी' या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना हे गीत पहायला मिळणार आहे. हे भव्य दिव्य गीत नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. 

पारंपरिक लोककलांचा समावेश 

'कच्चा लिंबू' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर 'हिरकणी' हा प्रसाद ओकचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. या चित्रपटातील शिवराज्याभिषेक गीतामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, क्षिती जोग, राजश्री ठाकूर, संगीतकार राहुल रानडे यांनी परफॅार्म केलं आहे. ओवी, पोवाडा, कव्वाली, अभंग, धनगर, शेतकरी अशा सहा पारंपरिक लोककलांचा या गाण्यात समावेश करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता दर्शवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. या गाण्याचं लेखन कविभूषण, संदीप खरे यांनी केलं असून, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. 

लेखन चिन्मय मांडलेकरचं

नीलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दीपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव चाटी, संतोष बोटे  या गायक आणि गायिकांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. चित्रपटाचं लेखन चिन्मय मांडलेकरनं केलं असून, छायाचित्रण संजय मेमाणे, तर कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचं आहे. सुभाष नकाशे ह्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. शिवराज्याभिषेकाचा सोहळा चित्रपटातील भाग आहे. त्याची भव्यता गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लिंक - https://youtu.be/gxcJ8EPrMaEहेही वाचा -

रमाबाईंच्या भूमिकेनं अभिनेत्री म्हणून श्रीमंत केलं - शिवानी रांगोळे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा