Advertisement

‘साता जल्माच्या गाठी’ बांधल्या 'या' कलाकारांनी

छोट्या पडद्यावर काय किंवा मोठ्या पडद्यावर काय नेहमीच नवनवीन जोड्या जुळतच असतात. आता ‘साता जल्माच्या गाठी’ या नव्या मालिकेत या नवीन कलाकारांची जोडी जमल्याचं पहायला मिळणार आहे.

‘साता जल्माच्या गाठी’ बांधल्या 'या' कलाकारांनी
SHARES

छोट्या पडद्यावर काय किंवा मोठ्या पडद्यावर काय नेहमीच नवनवीन जोड्या जुळतच असतात. आता ‘साता जल्माच्या गाठी’ या नव्या मालिकेत या नवीन कलाकारांची जोडी जमल्याचं पहायला मिळणार आहे.


अनोखी लव्हस्टोरी 

प्रेम ही अडीच अक्षरं फक्त कानावर जरी पडली तरी अनेकांच्या अंतकरणातील तारा छेडल्या जातात. प्रत्येकाच्या मनात ‘त्या’ खास व्यक्तीबद्दलचा हळवा कोपरा हा असतोच. प्रेमात पडणं जरी सोपं असलं तरी ते निभावणं मात्र कठीण. प्रेमासाठी कायपण करण्याची तयारी असणारे प्रेमवीरew-marathi-serial-sata-jalmachya-gathi-on-star-pravah अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतकेच. युवराज त्यापैकीच एक. श्रुतीवर जीवापाड प्रेम करणारा आणि प्रेमासाठी कायपण करायला तयार असणारा. श्रुती आणि युवराजची ही अनोखी लव्हस्टोरी स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत पाहायला मिळेल. या मालिकेच्या निमित्तानं विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर ही जोडी टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. सातारी भाषेचा लहेजा जपत या दोघांनीही मालिकेची गोडी वाढवली आहे.


साताऱ्यात घडणारी गोष्ट 

प्रेमाच्या आणाभाका देत सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या दोघांच्याही प्रेमाची गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. यांनाही बरीच अग्निदिव्य पार करावी लागणार आहेत. म्हणूनच युवराज श्रुतीची ही प्रेमकहाणी थोडी हटके आहे. सध्या या मालिकेच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेविषयी ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, ‘साता जल्माच्या गाठी’ ही मालिका नावाप्रमाणंच मातीत रुळलेली लव्हस्टोरी सांगणारी आहे. विशेष म्हणजे साताऱ्यात घडणारी गोष्ट आहे. त्यामुळं साताऱ्यातच मालिका शूट होत आहे. मालिकेतले बरेचसे कलाकार साताऱ्यातले आहेत त्यामुळं एक वेगळी भट्टी जमून आली आहे. या मालिकेच्या निमित्तानं प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळी गोष्ट पाहायला मिळेल.


निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर 

श्वेता शिंदेच्या वज्र प्रोडक्शननं या मालिकेची निर्मिती केली आहे. श्वेता मुळची साताऱ्याची असल्यामुळे तिचं साताऱ्यावर विशेष प्रेम आहे. मालिकेसाठी कलाकार आणि ठिकाणाची जुळवाजुळव सुरु असताना सातारा आणि आसपासच्या परिसरातील कलाकारांच्या निवडीवर भर देण्यात आला. मालिकेत दिसणारा दिमाखदार बंगलाही साताऱ्याचाच आहे. स्टार प्रवाहसोबत श्वेताचे जुने बंध आहेत. ‘लक्ष्य’ मालिकेतील भूमिकेसाठी श्वेताचं विशेष कौतुक झालं होतं. ‘साता जल्माच्या गाठी’च्या निमित्तानं ती निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

 लिंक - https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/1246462468856956/

ew-marathi-serial-sata-jalmachya-gathi-on-star-pravah


हेही वाचा  -


... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना
बाप्पा गेले, आता मराठी सिनेमांची दिवाळी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा