गोवंडीत अल्पवयीन विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात आयुष्या ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. घरची परिस्थिती बेताची असल्याने मागील काही महिन्यापासून तिने घरात शिकवणी सुरू केली होती. या शिकवणीला अल्पवयीन १२ वर्षीय मुलगाही येत होता.

गोवंडीत अल्पवयीन विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या
SHARES

घरखर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून गोवंडीत एका १२ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आयुष्या इस्लाम हुसिया (३०) असं या शिक्षिकेचं नाव आहे.  या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.


आईला पैशांची चणचण

गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात आयुष्या ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. घरची परिस्थिती बेताची असल्याने मागील काही महिन्यापासून तिने घरात शिकवणी सुरू केली होती. या शिकवणीला अल्पवयीन १२ वर्षीय मुलगाही येत होता. त्या मुलाच्या घरची परिस्थितीही हलाखीची होती. त्या मुलाची आई दुसऱ्याच्या घरी काम करून त्याला शिकवत होती. मात्र, या महिन्यात मोठा खर्च आल्याने तिला घरचे सामानही भरता आले नव्हते. मुलाच्या आईला पैशांची चणचण असल्यामुळे तिने शिकवणी घेणाऱ्या आयुष्याकडे पैशांची मदत मागितली. मात्र आयुष्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला.


मदत न केल्याचा राग

मदत न केल्याचा राग आल्याने त्याने आयुष्या यांचे घर गाठले. लक्ष नसलेल्या आयुष्यावर त्याने तिच्याच घरातील चाकूने हल्ला करत पळ काढला. मुलाने चाकूने केलेला घाव हा आयुष्याच्या वर्मी लागल्याने तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तिला स्थानिकांनी उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान आयुष्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत ३०२ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.  हेही वाचा -

विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या शिक्षकाला अटक

सोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा अटकेत
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा