सोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा अटकेत

अचानक ९ एप्रिल २०१८ मध्ये मिश्राने महिलेबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर आणि तिचे माँर्फ केलेले फोटो पोस्ट केला. त्यानंतर महिलेने त्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ब्लाँक केले.

सोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा अटकेत
SHARES

मुंबईच्या ओशिवरा परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेची फेसबुक, इन्स्टाग्रामवर बदनामी करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. नितीन मिश्रा असं या आरोपीचं नाव आहे. त्याने हे कृत्य का केलं हे अद्याप स्पष्ठ झालं नसून न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडलं आहे.


उत्तर प्रदेशहून अटक

नितीन मिश्रा हा मूळचा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील करेलागावचा रहिवाशी आहे. तर २८ वर्षीय तक्रारदार महिला ही एका नामांकीत कंपनीत एचआर म्हणून काम करते. २०१६ मध्ये तिला मिश्राने फेसबुक इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ती महिलेने स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये चांगले मैत्रीचे संबंधही प्रस्थापित झाले होते. अचानक ९ एप्रिल २०१८ मध्ये मिश्राने महिलेबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर आणि तिचे माॅर्फ केलेले फोटो पोस्ट केले. त्यानंतर महिलेने त्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ब्लाॅक केले. त्यावेळी तिने ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी मिश्राला सोमवारी उत्तर प्रदेशहून अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा  - 

एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी आणखी एकाला अटक

मुंबईसहीत ७ रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची धमकी, ‘जैश ए मोहम्मद’चं पत्र
संबंधित विषय