मुंबईसहीत ७ रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची धमकी, ‘जैश ए मोहम्मद’चं पत्र

मुंबईसह देशभरातील ७ रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवून देण्याची धमकी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे.

मुंबईसहीत ७ रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची धमकी, ‘जैश ए मोहम्मद’चं पत्र
SHARES

मुंबईसह देशभरातील ७ रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवून देण्याची धमकी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे. हरियाणातील रोहतक रेल्वे स्थानक  (Rohtak Railway junction‌) अधिकाऱ्यांना या धमकीचं पत्र मिळालं आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे पत्र खरं आहे की खोटं याची तपासणी होत असून तोपर्यंत कुणीही याबाबत अफवा पसरवू नये, असं आवाहन रेल्वेने केलं आहे.

काय आहे पत्रात?

शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्टेशन सुपरिटेंडेंट यशपाल मीणा यांच्या कार्यालयात साध्या पोस्टाद्वारे हे पत्र आलं. या पत्रात ८ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह रोहतक जंक्शन, रेवाड़ी, हिसार, कुरुक्षेत्र, बंगळुरू, चेन्नई, जयपूर, भोपाळ, कोटा, इटारसी रेल्वे स्थानकांसोबत राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उ. प्रदेश आणि हरियाणा या ६ राज्यातील मंदिरामध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे.


कुणी पाठवलं?

वहीच्या साध्या पानावर हिंदीतून ही धमकी लिहिण्यात आली आहे. हे धमकीचं पत्र मसूद नावाच्या व्यक्तिने कराची, पाकिस्तानमधून पाठवलं आहे. हा मसूद म्हणजे जैश ए मोहम्मद Jaish-e-Mohammed (JeM) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर असल्याचं म्हटलं जात आहे. या पत्रानंतर जीआरपी आणि आरपीएफ जवानांनी रेल्वे स्थानक तसंच रेल्वेमधील चेकींग वाढवली आहे.  

घातपाताची तयारी

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान भारतात अतिरेकी कारवाया करण्याच्या प्रयत्नात आहे. जैश एक मोहम्मदचे ५० दहशतवादी भारतात घुसून घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची खबर बाॅर्डर सिक्युरिटी फोर्सने दिली होती. तर मसूद अजहरची तुरूंगातून गुपचूप सुटका केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.  

या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून या पत्राची सत्यता पडताळणी केली जात आहे. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर पत्रात उल्लेख करण्यात आलेल्या ठिकाणांचीही सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.हेही वाचा-

बाॅडीबिल्डर सुहास खामकरच्या नावाने बनावट फेसबुक खातं, मुलींशी अश्लील संवाद

घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदा बेटिंग करणाऱ्या ११ जणांना अटकसंबंधित विषय