बाॅडीबिल्डर सुहास खामकरच्या नावाने बनावट फेसबुक खातं, मुलींशी अश्लील संवाद

शरीर सौष्ठवपटू सुहास खामकर यांचे देश, विदेशात अनेक चाहते आहे. त्यांचे समाज माध्यमात अनेक फॉलोवर्स आहेत. याचाच फायदा काही समाजकंटक घेत आहेत. खामकर यांच्या नावाचे समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करून महिला व मुलींशी नको तो संवाद साधला जात आहे.

SHARE

आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या प्रसिद्ध  बाॅडीबिल्डर सुहास खामकर यांच्या नावाने तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुहास यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून मुलीची फसवणूक केली जात होती. याबाबत सुहास खामकर यांनी  टिळकनगर पोलिसात अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


बनावट खातं 

शरीर सौष्ठवपटू सुहास खामकर यांचे देश, विदेशात अनेक चाहते आहे. त्यांचे समाज माध्यमात अनेक फॉलोअर्स आहेत. याचाच फायदा काही समाजकंटक घेत आहेत. खामकर यांच्या नावाचं समाज माध्यमांवर बनावट अकाऊंट तयार करून महिला व मुलींशी नको तो संवाद साधला जात आहे.  अनेकवेळा तर त्यांना सुहास खामकर बोलतो असं म्हणून कॉल केला जातो आणि त्यांच्याशी नको त्या विषयी बोललं जातं. या प्रकारामुळे सुहास खामकर यांची बदनामी होत आहे.


सायबर कक्षाद्वारे चौकशी 

याबाबत खबरदारी म्हणून आणि या तोतयाविरोधात खामकर यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तर याप्रकरणी सायबर कक्षाद्वारे चौकशी होणार आहे. सुहास खामकर नावाने जी खाते आहेत, ती व्हेरिफिकेशन केलेली म्हणजे, निळी टिकमार्क केलेली आहेत. त्यामुळे कोणीही इतर खात्यांवर व्यवहार करू नये. जर आपणास कोणी खोटा फोन केला तर माझ्याशी अथवा पोलिसांशी संपर्क साधावं असं आवाहन सुहास खामकर यांनी केलं आहे.हेही वाचा -

'हे' आहेत मुंबईतले टाॅप एन्काऊंटर स्पेशलिस्ट

खोटे सोनं तारण ठेवून बँकेची फसवणूक, कर्मचाऱ्याला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या