खोटे सोनं तारण ठेवून बँकेची फसवणूक, कर्मचाऱ्याला अटक

धारावीच्या इंडियन बँकेच्यातर्फे कर्ज न भरणाऱ्या खातेदारांच्या सोन्याचा लिलाव करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार बँकेतील लाॅकरमध्ये ठेवलेल्या सोन्यांची तपासणी सुरू होती. तपासणी करताना लाॅकर नंबर ७७ मध्ये ठेवण्यात आलेले सोनं हे नकली असल्याचं लक्षात आलं.

खोटे सोनं तारण ठेवून बँकेची फसवणूक,  कर्मचाऱ्याला अटक
SHARES

 खोटं सोनं १९ बँकांमध्ये गहाण ठेवून बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या प्राॅपर्टी सेल पोलिसांनी पर्दाफाश केला होता. नेमकं त्याच पद्धतीने धारावीत एका बँक कर्मचाऱ्याने ग्राहकाने गहाण ठेवण्यासाठी दिलेल्या सोनाचा दूरूपयोग करून त्याऐवजी नकली सोनं बँकेत गहाण ठेवून कोट्यावधी रुपये कर्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी धारावी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.  


लाॅकर नंबर ७७  

धारावीच्या इंडियन बँकेच्यातर्फे काही दिवसांपूर्वी कर्ज न भरणाऱ्या खातेदारांच्या सोन्याचा लिलाव करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार बँकेतील लाॅकरमध्ये ठेवलेल्या सोन्यांची तपासणी सुरू होती. तपासणी करताना लाॅकर नंबर ७७ मध्ये ठेवण्यात आलेले सोनं हे नकली असल्याचं लक्षात आलं. हे सोनं कुणाच्या निदर्शनाखाली ठेवण्यात आॆॆल्याची विचारपूस सुरू असताना कुणीही त्या नकली सोन्याची जबाबदारी घेण्यास तयार नव्हतं. त्यावेळी बँकेने या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिस तपासात ग्राहकांकडून आलेले सोने प्रमाणित करण्याची जबाबदारी बँकेतील कर्मचारी रामास्वामी नाडर याच्याकडे होती. दोन वर्षांपासून या ठिकाणी काम करणाऱ्या रामास्वामीचे अॅण्टॉप हिल परिसरात दागिन्यांचं दुकानही होतं. पोलिसांच्या तपासामध्ये रामास्वामी याची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या रामास्वामी याने हे कृत्य आपण केल्याचं मान्य केलं.

बनावट ग्राहक

अॅण्टॉप हील येथील रहिवासी असलेल्या रामास्वामी याने आपल्या परिचयातील १२ जणांचे पॅनकार्ड, आधारकार्ड तसंच इतर कागदपत्रे जमा केली. त्यांच्या नावे बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज केले. दादर येथून नकली दागिने खरेदी करून ते या ग्राहकांना द्यायचा. ग्राहक बँकेत घेऊन आल्यावर रामास्वामी स्वतःच ते खरे असल्याचे प्रमाणित करून द्यायचा. कर्ज मंजूर झाल्यावर काही रक्कम या ग्राहकांना दिली जाई आणि उर्वरित रक्कम रामास्वामी स्वतः वापरत असल्याचं चौकशीत पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा -

'हे' आहेत मुंबईतले टाॅप एन्काऊंटर स्पेशलिस्ट




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा