एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी आणखी एकाला अटक

एटीएसच्या विक्रोळी पथकाने मागील आठवड्यात मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती.

एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी आणखी एकाला अटक
SHARES

मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने पनवेल येथील केमिकल कारखान्यातून १२५ एमडी ड्रग्ज भांडुप येथून जप्त केलं होतं. या प्रकणात पोलिसांनी आता सरदार पाटील या आणखी एका तस्कराला अटक केली आहे. सरदार याला एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणाऱ्या रसायनांची माहिती होती. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 एटीएसच्या विक्रोळी पथकाने मागील आठवड्यात मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. भांडुप पम्पिंग स्टेशनजवळ असलेल्या बस क्र ३६८  आणि ३७३ बसस्टाॅप येथे पथकाने सापळा लावला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून सुरूवातीला ९ किलो एमडी पावडर हस्तगत करत, आरोपी रज्जाक उर्फ अरिफ आणि सुलेमान यांना अटक केली. या दोघा आरोपीच्या चौकशीतून हे ड्रग्ज पनवेल येथील कारखान्यातून आणण्यात आलं असल्याचं पुढं आलं. त्यानुसार पोलिसांनी पनवेल येथील कारखान्यातून उर्वरित १२० किलो एमडी जप्त करत जितेंद्र परमार, नरेश म्हसकर आणि अन्य एकाला अटक केली.

हे त्रिकुट प्रतिबंधीत असलेल्या एमडी पावडर राज्यभरात वितरित करीत होते. या एमडी पावडरची प्रति किलो ४० लाख रुपये किंमत आहे. आतापर्यंत एमडी पावडरची विक्री करून जमवलेले ५२ कोटी ६४ लाख ९४ हजार रुपये पथकाने हस्तगत केले आहे. अटक आरोपी हे नवीन पनवेलमधील कारखान्यात एमडी पावडर बनविण्यासाठी उच्च दर्जाचे रसायन पुरवून मोठ्या प्रमाणात एमडी अमली पदार्थाची निर्मिती करीत होते.

मुंबई ठाणे आणि नवी मुंबईसह अनेक शहरात एमडी पावडर पुरविण्याचे मोठं नेटवर्क असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या अटक आरोपींच्या तपासात आणखी खुलासे होत गेले. त्यावेळी सरदार पाटील याला या एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणाऱ्या रसायनाची माहिती असल्याचं समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली. या प्रकरणी एटीएस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

मुंबईसहीत ७ रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची धमकी, ‘जैश ए मोहम्मद’चं पत्र

बाॅडीबिल्डर सुहास खामकरच्या नावाने बनावट फेसबुक खातं, मुलींशी अश्लील संवाद




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा