विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या शिक्षकाला अटक

बदलापूर परिसरात राहणारा संतोषकुमार हा कुर्ला परिसरात खासगी क्लासेसद्वारे शिकवणी घ्यायचा. त्याच्याकडे तक्रारदार तरूणी ही दहावी आणि अकरावीसाठी शिकवणीला जात होती. मात्र तिच्यावर संतोषकुमारची वाईट नजर होती.

विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या शिक्षकाला अटक
SHARES

मुंबईच्या कुर्ला रेल्वे पोलिसांनी माजी विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या एका ४१ वर्षीय शिक्षकाला अटक केली आहे. संतोषकुमार मुनी असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


शिकवणीच्या नावाखाली जवळीक

मुंबईच्या बदलापूर परिसरात राहणारा संतोषकुमार हा कुर्ला परिसरात खासगी क्लासेसद्वारे शिकवणी घ्यायचा. त्याच्याकडे तक्रारदार तरूणी ही दहावी आणि अकरावीसाठी शिकवणीला जात होती. मात्र तिच्यावर संतोषकुमारची वाईट नजर होती. अनेकदा तो तिच्याशी शिकवणीच्या नावाखाली जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र संतोषकुमारचे चाळे लक्षात आल्यानंतर तरुणीने संतोषकुमारकडून शिकवणी बंद केली.

जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न

 सध्या तरुणी ही पवईच्या एका नामांकित काॅलेजमध्ये शिकत आहे. कांजूरमार्गाहून ती लोकल पकडून काॅलेजला जात होती. त्यावेळी संतोषकुमार तिचा पाठलाग करत असल्याचं निर्दशनास आलं. एवढ्यावरच न थांबता त्याने अनेकदा तिची वाट अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला. मात्र, संतोषकुमारचा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता. १२ सप्टेंबर रोजी तरुणी कुर्ला स्थानकावर असताना संतोषकुमारने तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करत संतोषकुमारची तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोषकुमारला अटक केली. या प्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करत आहेत.   



हेही वाचा  -

सोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा अटकेत

एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी आणखी एकाला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा