मुलांना घेऊन बेपत्ता झालेली शाळेची बस अखेर सापडली, बसमधील मुलं...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस गेल्या ५ तासापासून बेपत्ता होती. पण अखेर ही बस सापडली आहे. सांताक्रूझमधील पोद्दार शाळेची ही बस आहे. 

शाळा सुटल्यानंतर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेनं निघाली होती. पण नेहमीच्या वेळेत घरी पोहोचली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तातडीनं शाळेकडे धाव घेतली. या स्कूल बसच्या चालकाचा मोबाइल स्वीच ऑफ येत असल्यानं पालक धास्तावलं होते.

मुंबईतील सांताक्रूझमध्ये पोद्दार स्कूल आहे. या शाळेची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी बस आहे. आज नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातून घेऊन शाळेत आली. दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर, विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर जरी पडली असली तरी ती बस घरापर्यंत पोहोचलीचनव्हती.

शाळा सुटून जवळपास ५ तास होत आले तरी बसचा अद्याप पत्ता लागलेला नव्हता. पोलिसांना माहिती मिळताच याचा तपास करण्यात आला. काही तासातच पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिस सहआयुक्त कायदा सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील यांनी एका चॅनलला माहिती दिली की, "बस सापडली आहे. घाबरायचं कारण नाही. मुलं त्यांच्या घरी पोहोचली देखील आहेत. आजपासून शाळा सुरू झाली. शाळेचा पहिला दिवस होता. बसचा चालक नवीन असल्यामुळे मुलांना उशीर झाला. दोन दिवस बस बंद ठेवण्यात आली आहे."  

यासोबतच पोलिसांनी हे देखील स्पष्ट केलं की, कुठलाही अपघात किंवा घातपात नाही झाला आहे. त्यामुळे पूर्ण माहिती नसताना कुठल्याही अफवा पसरवू नका.


हेही वाचा

मुंबईकरांसाठी खूशखबर, मेट्रो ७ सह २अ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या