Advertisement

मुंबईकरांसाठी खूशखबर, मेट्रो ७ सह २अ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार

आगामी काळात मेट्रोच्या दोन्ही लाईन्स सुरू झाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावरील २५ टक्के वाहतूक कोंडी कमी होईल.

मुंबईकरांसाठी खूशखबर, मेट्रो ७ सह २अ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार
SHARES

मुंबईकरांसाठी (Mumbai) दिलासादायक ठरणाऱ्या मेट्रो २अ आणि मेट्रो ७ (Metro) येत्या १५ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहेत. एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबई मेट्रो 7 चा अंधेरी ईस्ट ते आरे हा टप्पा तर मेट्रो २अ वरील डीएन नगर ते डहाणूकरवाडी येथील टप्पा १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरु होणार आहे. २ अ लाईनवरील अंधेरी वेस्ट स्टेशन हे वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मेट्रो लाईनवरील डीएन नगर स्टेशनशी इंटरकनेक्टींग असेल.

एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी मेट्रो २अ आणि मेट्रो ७ चं ७५ टक्के काम पूर्ण झालं असल्याचं म्हटलं. या दोन्ही लाईनवरील काम अंतिम टप्प्यात असून लवकरचं पूर्ण होईल, असं श्रीनिवास म्हणाले. मेट्रोच्या कामांचा वेग वाढला असल्याचं देखील श्रीनिवास यांनी सांगितलं आहे.

आगामी काळात मेट्रोच्या दोन्ही लाईन्स सुरू झाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावरील २५ टक्के वाहतूक कोंडी कमी होईल.

दरम्यान, ऑक्टोबर २०२४ पर्यंत लाइन ९ (दहिसर ते भाईंदर) कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम उपनगरे भाईंदरपर्यंत सर्व मार्गानं सुरळीत प्रवासाची अपेक्षा करू शकतात. MMRDA ची देखील लाईन ७ ला विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनलपर्यंत वाढवण्याची योजना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं २०१५ मध्ये भूमिपूजन करण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्यात मेट्रो २अ प्रकल्पातील ९ स्थानक गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये दहिसर पूर्व, आनंद नगर, कंदार पाडा, मंडपेश्वर, एक्सर, बोरिवली पश्चिम, पहाडी एक्सर, कांदिवली पश्चिम, डहाणूकर वाडी स्थानकांचा समावेश आहे.

तर, मेट्रो ७ मधील एकूण १० स्थानक गुढीपाडव्यापासून सुरु झाली असून त्यामध्ये आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोयसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा, दहिसर पूर्व या स्थानकांचा समावेश आहे.हेही वाचा

२ दिवसात 'इतक्या' प्रवाशांनी केला नव्या मेट्रोनं प्रवास

ॲपआधारित टॅक्सींना तात्पुरत्ये ॲग्रीगेटर लायसन्स देणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा