Advertisement

२ दिवसात 'इतक्या' प्रवाशांनी केला नव्या मेट्रोनं प्रवास

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी, २ एप्रिल रोजी नवीन मोट्रोच्या मार्गीकेचे उद्घाटन केले.

२ दिवसात 'इतक्या' प्रवाशांनी केला नव्या मेट्रोनं प्रवास
SHARES

डहाणूकरवाडी-आरे-दहिसर दरम्यान मेट्रो २A आणि ७चं गुढीपाडव्यादिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ एप्रिलला सुमारे ५५,००० प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

रविवारी सकाळी सहा वाजता ही सेवा सुरू करण्यात आली ती रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, दिवसभर गर्दी नव्हती. पण रविवारी संध्याकाळी मेट्रोला गर्दी होऊ लागली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी, २ एप्रिल रोजी संध्याकाळी हिरवा झेंडा दाखवला. त्याच दिवशी, सेवा सुरू झाल्यानंतर लगेचच, रात्री ८ ते १० या दोन तासांच्या सेवेमध्ये २०,००० हून अधिक लोकांनी मेट्रोमधून प्रवास केला.

दरम्यान, दोन्ही दिवशी काही तांत्रिक बिघाडांमुळे मेट्रो सेवा १०-१५ मिनिटे प्रभावित झाली होती. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली. शनिवारी रात्री १० वाजता कांदिवलीहून आरे मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, रविवारी सकाळी उशिराही असाच गोंधळ दिसून आला. त्यामुळे मेट्रोच्या रेकचा वेग कमी करावा लागला. अधिका-यांनी सांगितलं की, त्रुटी दुरुस्त करण्यात आली आणि रेक त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचला.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, कामकाज सुरळीत होण्यास थोडा वेळ लागला. पण येत्या काही दिलस अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

२० किमीचा पहिला टप्पा लाइन २A च्या डहाणूकरवाडी आणि लाईन ७च्या आरे दरम्यान आहे. दोन्ही टप्प्यांची संपूर्ण लांबी सुमारे ३५ किमी आहे.

८ वर्षांच्या कालावधीनंतर लोकांसाठी खुला होणारा मेट्रो कॉरिडॉरचा हा दुसरा भाग आहे. अंधेरी-घाटकोपर आणि वर्सोवा दरम्यान १२ किमी लांबीचा मेट्रो मार्ग जून २०१४ मध्ये सुरू झाला होता.हेही वाचा

ॲपआधारित टॅक्सींना तात्पुरत्ये ॲग्रीगेटर लायसन्स देणार

मुंबई मेट्रो लाइन २A आणि ७च्या प्रवाशांचा प्रवास होणार 'बेस्ट'च!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा