Advertisement

मुंबई मेट्रो लाइन २A आणि ७च्या प्रवाशांचा प्रवास होणार 'बेस्ट'च!

दोन नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाठव्याला म्हणजेच शनिवार, २ एप्रिल रोजी होणार आहे.

मुंबई मेट्रो लाइन २A आणि ७च्या प्रवाशांचा प्रवास होणार 'बेस्ट'च!
SHARES

मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA)नं आगामी मेट्रो लाईन 2A आणि मेट्रो लाईन 7 साठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) सोबत हातमिळवणी केली आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळापर्यंत जाण्यासाठी मेट्रो स्टेशनच्या बाहेर बेस्टचा देखील पर्याय उपलब्ध होणार आहे.

मेट्रो लाईन 2A आणि मेट्रो लाईन 7 या दोन नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार, २ एप्रिल रोजी होणार आहे. शिवाय, नवीन मेट्रो मार्गांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. सध्या मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान एकच मेट्रो मार्ग आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त, एसव्हीआर श्रीनिवास यांनी माहिती दिली की, नवीन आराखडा, तसंच बेस्टला प्रदान केलेल्या डिझाइनला मान्यता देण्यात आली आहे. फ्री प्रेस जर्नलनं मेट्रो स्थानकांच्या जवळपास ५०-७५ मीटरच्या आवश्यक अंतरावर किती नवीन बस स्टॉप सुरू होणार आहेत हे देखील स्पष्ट केले.

इंटर-मॉडल इंटिग्रेशन उपयुक्त ठरेल आणि इंटरमीडिएट पब्लिक ट्रान्सपोर्ट लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी म्हणून काम करेल असा त्यांचा विश्वास आहे. याबाबत गेल्या सहा महिन्यांत बेस्टच्या अधिकाऱ्यांशी अनेक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

दुसरीकडे, बेस्टच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, दोन नवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त बसेसची आवश्यकता असेल.



हेही वाचा

गुड न्यूज! गुढीपाडव्याला मुंबई मेट्रो ७, २A'चे मुख्यमंत्री करणार उद्घाटन

सर्व टोल प्लाझा हटवले जाणार, नितीन गडकरींची घोषणा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा