Advertisement

गुड न्यूज! गुढीपाडव्याला मुंबई मेट्रो ७, २A'चे मुख्यमंत्री करणार उद्घाटन

मराठी नवीन वर्षाच्यानिमित्तानं मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे.

गुड न्यूज! गुढीपाडव्याला मुंबई मेट्रो ७, २A'चे मुख्यमंत्री करणार उद्घाटन
(File Image)
SHARES

मराठी नवीन वर्षाच्यानिमित्तानं मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये २० किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात १५ किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे.

अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' च्या तिकिटाचे किमान दर १० रुपये असणार असून कमाल दर ८० रुपये असणार आहेत.

‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’च्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण १० मेट्रो गाडय़ा वापरण्यात येणार आहेत. या गाड्यांची चाचणी मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तर आता या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या गाड्या प्रवासी क्षमतेसह धावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात मेट्रोचे व्यवस्थापन आणि मेट्रो चालवण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहे.

एमएमआरडीएच्या आधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणेने आवश्यक त्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असून सेवा देण्यासाठी कर्मचारीवृंद सज्ज झाला आहे.

'मेट्रो 2 अ' हा १८.५ किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे.

या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.

मेट्रो-7 मार्गावर १४ स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.



हेही वाचा

पालिकेचा 'बेस्ट'ला मदतीचा हात, दिला २६४ कोटींचा निधी

सर्व टोल प्लाझा हटवले जाणार, नितीन गडकरींची घोषणा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा