Advertisement

पालिकेचा 'बेस्ट'ला मदतीचा हात, दिला २६४ कोटींचा निधी

पालिकेनं हा निधी आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला वर्ग केला आहे.

पालिकेचा 'बेस्ट'ला मदतीचा हात, दिला २६४ कोटींचा निधी
SHARES

विजेवर धावणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मुंबई महापालिकेला (BMC) २६४ कोटी रुपये दिले आहेत. पालिकेनं हा निधी आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला वर्ग केला आहे. विजेवरील बस (Electric Vehicles) घेण्यासाठी बेस्टला हा निधी देण्यात आला आहे.

पुढील पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून विजेवर धावणारी वाहनं घेण्यासाठी ९४० कोटी रुपये पालिकेला मिळणार आहेत. तेही बेस्टलाच देण्यात येणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर वाढवून प्रदूषण नियंत्रणात आणता यावे यासाठी केंद्र सरकारनं मुंबई महापालिकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी २६४ कोटी रुपये अनुदान दिले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त हा निधी पालिकेच्या तिजोरीत जमा झाला.

मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये बस सेवा उपलब्ध करणारा बेस्ट उपक्रम पालिकेचे एक अंग आहे. प्रदूषण रोखण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ांचा समावेश करण्यात येत आहे.

विजेवरील बसगाडय़ा घेण्याबरोबरच चार्चिग केंद्र आणि अन्य आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी हा निधी बेस्टला उपयोगी पडेल.

सध्या बेस्टच्या ताफ्यात तीन हजार ५०० बसगाडय़ा असून त्यापैकी ३८४ बसगाडय़ा विजेवर धावणाऱ्या आहेत. बेस्ट उपक्रमासमोर आपल्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ांची संख्या २०२३ पर्यंत ५० टक्के, तर २०२७ पर्यंत १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे.



हेही वाचा

गुढी पाडव्याला मेट्रो २A, मेट्रो ७ चा शुभारंभ!

सर्व टोल प्लाझा हटवले जाणार, नितीन गडकरींची घोषणा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा