Advertisement

गुढी पाडव्याला मेट्रो २A, मेट्रो ७ चा शुभारंभ!

मेट्रो ७ आणि मेट्रो २-ए पाडव्याच्या मुहूर्तावर मार्गी लागणार आहे.

गुढी पाडव्याला मेट्रो २A, मेट्रो ७ चा शुभारंभ!
SHARES

पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास लवकरच सुलभ होणार आहे. कारण गुढी पाडव्याच्या (Gudi padwa) मुहुर्तावर मुंबईला दुसरी मेट्रो (Mumbai Metro) लाइन मिळण्याची शक्यता आहे. मेट्रो ७ आणि मेट्रो २-ए पाडव्याच्या मुहूर्तावर मार्गी लागणार आहे.

मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) आणखी दोन मार्गांचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. दोन्ही मेट्रोची अपेक्षित कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून आवश्यक प्रमाणपत्र प्राधिकरणाला मिळालं आहे.

मुंबईत मेट्रो -7 म्हणजेच रेड लाईन आणि मेट्रो -2 ए म्हणजेच यलो लाइनचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. दोन्ही मार्गांवर चाचणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मुंबईच्या (Mumbai) विविध स्थानकांचे कामही पूर्णत्वास आले आहे.

मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व पर्यंत साडे सोळा किलोमीटर (16.475 किमी) लांबीवर पसरली आहे. या मार्गावर एकूण १३ मेट्रो स्टेशन येत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर हा मार्ग तयार करण्यात आला आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीची समस्या दूर होण्याची अपेक्षा आहे.

मेट्रो २-ए डीएन नगर ते दहिसर पर्यंत एकूण अठरा किलोमीटर (18.589 किमी) लांबीवर पसरली आहे. या मेट्रो मार्गात एकूण १७ मेट्रो स्टेशन येणार आहेत. हा मेट्रो मार्ग सध्याच्या मुंबई लोकल मार्गापासून दूर लिंक रोडवर तयार केला जात आहे.

एमएमआरडीए, राज्य सरकारची आवश्यक परवानगी घेऊन, जेव्हा सरकार निर्णय घेईल तेव्हा ऑपरेशन सुरू करू शकते.

सीएमआरएसनं या धर्तीवर दोन वेळा तपासणी केली होती आणि एमएमआरडीएला आवश्यक त्रुटी किंवा सुधारणा देखील कळवल्या होत्या, ज्या एमएमआरडीएने दुरुस्त केल्याचा दावा केला आहे.

दहिसर पू्र्व ते डहाणूकर वाडी अशी मेट्रो धावणार आहे. मेट्रो 7 आरे ते दहिसर पूर्व याची किमान तिकीट 10, तर कमाल तिकीट 40 रुपये असणार आहे.आरे ते डहाणूकर वाडी असा मेट्रोचा टप्पा सेवेत दाखल होईल. दर दहा मिनीटांनी एक मेट्रो धावणार आहे.

मेट्रो लाईन 2 A ते दहीसर पूर्व ते डीएन नगर. ही मेट्रो आनंद नगर, ऋषी संकुल, आयसी काॅलनी, एकसर, डाॅन बाॅक्सो, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, गोरेगाव, आदर्श नगर, शास्त्री नगर, डीएन नगर.

अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व

स्थानके- दहीसर, ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अॅंड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व)

दोन्ही महानगरांचे भूमिपूजन ऑक्टोबर २०१५ मध्ये झाले. काम २०१६ मध्ये सुरू झाले. आता हे आव्हानात्मक काम पूर्णत्वास आले आहे. एमएमआरडीएनं त्यांच्या कार्याचा मुहूर्त जाहीर केला आहे.



हेही वाचा

मध्य रेल्वे मुंबई-नागपूर दरम्यान २ विशेष गाड्या चालवणार

पालिकेकडून 'या' २ मेट्रो स्थानकांचा पाणीपुरवठा खंडीत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा