Advertisement

पालिकेकडून 'या' २ मेट्रो स्थानकांचा पाणीपुरवठा खंडीत

मुंबई महापालिकेनं थेट मुंबई मेट्रोवरच धडक कारवाई केली आहे.

पालिकेकडून 'या' २ मेट्रो स्थानकांचा पाणीपुरवठा खंडीत
SHARES

मालमत्ता कर वसुलीकरता मुंबई महापालिकेनं थेट मुंबई मेट्रोवरच धडक कारवाई केली आहे.

महापालिकेनं मुंबई मेट्रो अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. डीएन नगर आणि अंधेरी वेस्ट येथे मेट्रो स्थानकांचा पाणीपुरवठा तोडला आहे.

मुंबई महापालिका प्रशासनानं यापूर्वी मुंबई मेट्रो १ च्या ११ मालमत्तांना नोटीस पाठवली होती. यात आठ मेट्रो स्थानकांचाही समावेश होता.

'या' दोन स्थानकांचा पाणीपुरवठा तोडला

डीएन नगर स्थानक
अंधेरी वेस्ट स्थानक

मुंबई मेट्रोनं २०१३पासून आजतागायत ११७ कोटी ६२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. थकित कराची रक्कम २१ दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश यापूर्वीच्या नोटीसमध्ये देण्यात आले होते. या कालावधीत थकबाकीची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असा इशाराही देण्यात आला होता.

MMRDA आणि MMOPL यांच्यात मालमत्ता कोणी भरायचा यावरुन वाद असल्यानं मालमत्ता कर भरलेला नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मालमत्ता कर वसुलीसाठी नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक, डी एन नगर मेट्रो स्थानक, वर्सोवा मेट्रो स्थानक, एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक, पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक, जे बी नगर मेट्रो स्थानक, एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक, मरोळ मेट्रो स्थानक या आठ स्थानकांचा समावेश आहे.

यानंतरही कर न भरल्यास मलनि:स्सारण वाहिनी खंडित करण्यात येणार आहे. अखेर या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्यात येईल.हेही वाचा

मुंबई मेट्रो लाईन ७चे उद्घाटन लांबणीवर?

रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार स्वस्त दरात पाणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा