Advertisement

रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार स्वस्त दरात पाणी

प्रवाशांना कमी दरात आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी रेल्वे प्रशासनानं स्थानकात वॉटर व्हेडींगची सुविधा उपलब्ध केली आहे.

रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार स्वस्त दरात पाणी
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासात पाण्याची तहान लागते. अशावेळी प्रवाशी तहान भागविण्यासाठी रेल्वे स्थानकात असलेल्या स्टॉलवरून पाण्याची बॉटल खरेदी करतात. मात्र, प्रवाशांना कमी दरात आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी रेल्वे प्रशासनानं स्थानकात वॉटर व्हेडींगची सुविधा उपलब्ध केली आहे.

रेल्वे प्रवाशांची तहान भागविण्यासाठी आणि प्रवाशांना स्वस्त व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी मध्य रेल्वेने मुंबई विभागातील ३४ रेल्वे स्थानकांत ३५ नवीन वॉटर व्हेडींग मशिन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिन कार्यरत झाल्यानंतर प्रवाशांना बाटलीबंद पाणी विकत घेण्याची गरज भासणार नाही. मशिन उभारण्यासाठी निविदा मागवल्या असून तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने ३४ रेल्वे स्थानकांसाठी ३५ नवीन 'वॉटर व्हेंडिंग मशिन' बसवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. एका मशिनसाठी फलाटावर कमाल ३० चौरस फुटांपर्यंत जागा देण्यात येईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तातडीने त्या कार्यान्वित होणार असल्याची महिती मिळते.

रेल्वे प्रवाशांना एका रुपयात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) वॉटर व्हेडिंग मशिन सुरू केले. कोरोनाकाळात या मशिन बंद झाल्यानंतर अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा