Advertisement

मध्य रेल्वे मुंबई-नागपूर दरम्यान २ विशेष गाड्या चालवणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे मुंबई-नागपूर दरम्यान २ विशेष गाड्या चालवणार
(File Image)
SHARES

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं (CR) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान २ सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्र. ०११०१ सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून २६.०३.२०२२ रोजी (२५/२६.३.२०२२ च्या मध्यरात्री) ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्र. ०११०२ सुपरफास्ट स्पेशल ०३.०४.२०२२ रोजी नागपूरवरून १७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचेल.

कुठे थांबणार: दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा

रचना: तीन एसी २-टियर, चार एसी ३-टियर, ५ स्लीपर क्लास आणि ७ सामान्य द्वितीय श्रेणी

आरक्षण: ०११०१ आणि ०११०२ साठी विशेष शुल्कावरील बुकिंग २५.३.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडतील.

रेल्वेनं ट्रेन क्रमांक १२५१९/१२५२० लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या एसी एक्स्प्रेसला दोन वातानुकूलित थ्री-टायर डब्यांसह कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

१२५१९ लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या एसी एक्सप्रेस ३.४.२०२२ पासून आणि

१२५२० कामाख्या - लोकमान्य टिळक टर्मिनस एसी एक्सप्रेस ३१.३.२०२२ पासून

ट्रेन क्रमांक १२५१९/१२५२० ची सुधारित रचना खालीलप्रमाणे असेल

रचना: एक प्रथम श्रेणी एसी, फोर एसी-२ टियर, १४ एसी-३ टियर, एक पँट्री कार आणि दोन जनरेटर कम गार्डची ब्रेक व्हॅन

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांची PNR स्थिती तपासण्याची विनंती केली जाते. कृपया तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी COVID-19च्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहनही करण्यास सांगितलं आहे.



हेही वाचा

पालिकेकडून 'या' २ मेट्रो स्थानकांचा पाणीपुरवठा खंडीत

रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार स्वस्त दरात पाणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा