मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं मुंबईसह उपनगरात पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. शक्रवारी दुपारच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. जोरादार वाऱ्यासह मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं.

मागील काही दिवस मुंबईत उकाड्यानं मुंबईकर प्रचंड हैराण झाले आहेत. वाढतं तापमान पाहता मुंबईकर दुपारच्या सुमारास घरी राहण पसंत करत आहेत. मात्र, शुक्रवारी पावसानं हजेरी लावल्यानं दिवाळीनिमित्त कंदील, पणत्या, तोरणं यांची विक्री करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.


हेही वाचा -

देशातील पहिले ११ स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स मुंबईत


पुढील बातमी
इतर बातम्या