देशातील पहिले ११ स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स मुंबईत

या मल्टीप्लेक्समध्ये रोज ६० शो होणार असून जवळपास ६ हजार लोकांना चित्रपट पाहता येणार आहे.

SHARE

मुंबईमध्ये देशातील पहिले ११ स्क्रीन असणारे मल्टीप्लेक्स गुरूवारी सुरू झाले आहे. या मल्टीप्लेक्समधील वैशिष्ट्ये म्हणजे, येथील आसनांवर लावलेले बटन दाबून तुम्ही तुमच्या आवडीचे खाद्य पदार्थ मागवू शकता. 

आयनाॅक्सने हे ११ स्क्रीन असणारे मल्टीप्लेक्स सुरू केले आहे. मालाडमधील इनाॅर्बिट माॅल येथे असणारे हे मल्टीप्लेक्स ६० हजार चौरस फुटामध्ये बनवण्यात आलं आहे. या ठिकाणी मल्टी प्रोजेक्शन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यामुळे प्रेक्षकांना २७० अंशात पॅनारोमिक दृश्य बघता येतील.  प्रेक्षकांना आपल्या समोरील स्क्रीनसह डाव्या आणि उजव्या बाजूच्या स्क्रीनवरही चित्रपट बघता येणार आहे. या मल्टीप्लेक्समध्ये रोज ६० शो होणार असून जवळपास ६ हजार लोकांना चित्रपट पाहता येणार आहे. तर १५८६ लोक सहा वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटल सिनेमांचा आनंद घेऊ शकतील. 

मल्टीप्लेक्समध्ये सॅमसंग एलईडी स्कीनही लावण्यात आली आहेत. यामार्फत सीटवर बसल्याबसल्या एक बटन दाबून काॅफी, पिझ्झा, ज्यूस, , बर्गरसँडविचआईस्क्रीम आणि आपल्या आवडीचे खाद्य पदार्थ मागवता येणार आहेत. हेही वाचा -

अबब! ३१ हजारांची इलेक्ट्रिक सायकल

क्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय? मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा
संबंधित विषय
ताज्या बातम्या