Advertisement

क्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय? मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा

दुसऱ्यावर विश्वास ठेवून आपण आपली खाजगी आणि बँकेची माहिती चुकिच्या माणसाच्या हातात देतो आणि मग आपल्याकडे रडण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरत नाही. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही या महाठगांपासून स्वत:ला कसं वाचवू शकता...

क्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय? मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा
SHARES

आजकाल रोज पेपर उघडला की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नाहीतर इंटरनेट बँकिंगवरून फसवणूक झाल्याची एकतरी बातमी असतेच असते. पण अशा घटनांमध्ये बहुतांश बँक खातेधारकांचीही चुक असते. बँकेच्या नावानं आलेल्या कॉलवर आपली, कार्डचा १६ डिजिट नंबर, सीव्हीव्ही नंबर हे सर्व देऊन बसतात. अगदी शिकले सवरलेले पण या चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात. दुसऱ्यावर विश्वास ठेवून आपण आपली खाजगी आणि बँकेची माहिती चुकीच्या माणसाच्या हातात देतो आणि मग आपल्याकडे रडण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरत नाही. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही या महाठगांपासून स्वत:ला कसं वाचवू शकता

) डेबिट कार्डचा १६ अंकी नंबर

डेबिट म्हणजेच एटीम कार्डवर किंवा क्रेडिट कार्डावर हा १६ अंकी नंबर समोरच्या बाजूस छापलेला असतो. हा नंबर कुणालाही सांगायचा नाही. आपण एटीममधून पैसे काढतो तेव्हाची रिसीट किंवा क्रेडिट कार्डनं बिल भरल्यावर आलेला मेसेज नाहीतर ईमेल पाहा, तिथंही हा नंबर xxxx xxxx xxxx ६६८९ असा काहीसा लिहिलेला असतो.


तुमची बँक देखील शेवटचे चार आकडे दाखवून बाकीचे गुपित ठेवते. मग आपण तरी दुसऱ्याला ते नंबर का सांगावेतहे सोळा अंकी नंबर कुणालाही न सांगणंच उचित ठरेल.


) सीव्हीव्ही नंबर

तुमच्या कार्डच्या मागच्या बाजूला सीव्हीव्ही नंबर असतो. काळ्या पट्टीच्या खाली असलेला तीन आकडी नंबर महत्त्वाचा आहे. पाहिजे तर तुम्ही हा सीव्हीव्ही नंबर खोडू शकता. पण त्याआधी तुम्हाला तो नीट लक्षात ठेवावा लागेल. शिवाय कार्ड कधी हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी स्वाईप करायला दिलं तर लक्ष ठेवा.

त्यावरील तुमचा सोळा अंकी नंबर आणि सीव्हीव्ही चोरला जाऊ शकतो. एकदा नंबर चोरला गेला की त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे असे व्यवहार आपल्या डोळ्यासमोरच करा.

) चार अंकी पिन नंबर

पैसे काढताना, कुठे पेमेंट करताना किंवा अशाच काही कामासाठी तुम्हाला जो चार अंकी पासवर्ड टाकावा लागतो, तो कुणालाही सांगायचा नाही. एटीममध्ये पैसे भरताना किंवा काढताना काही प्रॉब्लेम आला दुसऱ्या कुणाची मदत घ्यायची नाही. कदाचित तुम्हाला मदत करण्याच्या बहाण्यानं स्वत:च्या कार्डशी तुमचं कार्ड बदली केलं जाऊ शकतं


याशिवाय तुमचा पिन नंबर देखील मदतीच्या नावाखालीच माहिती करून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे बँकेच्या बाबतीत कुणावरच विश्वास न ठेवलेला बरा. एटीएममध्ये पैसे काढायला जाताना देखील नंबरचं पॅड हातानं झाकून घ्यावं. अनेकदा कॅमेरा लावून तुमचा पिन नंबर चोरला जाऊ शकतो.

) ओटीपी नंबर

इंटरनेट बँकिंग करताना, काही खरेदी करताना किंवा मोबाइल नंबर पडताळून पाहायला बरेचदा आपल्या मोबाइलवर वन टाईम पासवर्ड येतो. हा कुणालाही सां५) व्यक्तीगत माहितीगायचा नाही.


) व्यक्तीगत माहिती

बऱ्याचदा आपल्याला बँकेतून कॉल आल्याचं सांगत सर्व माहिती विचारली जाते. आपणही सावधानता न बाळगता बँक आहे समजून सर्व माहिती देऊन मोकळे होतो.

त्यानंतर थोड्या वेळानं आपल्याला अमूक अमाऊंट खात्यातून काढल्याचा मेसेज येतो. तेव्हा मग फसवलं गेल्याचं लक्षात येतं. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.  हेही वाचा

ATM मधून पैसे न आल्यास बँकेला भुर्दंड, ग्राहकांना फायदा

'ह्या' बँकांचं Car Loan आहे स्वस्त, खिशावर नाही पडणार अधिक ईएमआय 

संबंधित विषय
Advertisement