सणांचा हंगाम सुरू होताच कार खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. सणांच्या मुहुर्तावर अनेक जण कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. शक्यतो कार खरेदी कर्ज काढूनच केली जाते. बँकांकडूनही वाहन कर्ज सहज उपलब्ध होते. त्यामुळे कार खरेदी करणं सोपं होतं. जवळपास सर्वच बँका कार कर्ज (car loan) देतात. त्यामुळे कार खरेदी करताना खरेदीदारांनी कुठल्या बँकेचा किती व्याजदर आहे, कर्जाचा कालावधी किती आहे याचा आढावा घेणं अत्यावश्यक आहे. अनेक बँकांचा व्याजदर तपासून पाहिल्यास किफायतशीर दरात कोणती बँक कर्ज देते हे समजेल.
सहसा बँकांचा वाहन कर्ज परतफेडीचा कालावधी ३.५ वर्षांचा असतो. मात्र अनेक बँका आता ७ वर्षांसाठी कर्ज देतात. कर्जाचा कालावधी जितका असेल जितका कमी ईएमआय तुम्हाला द्यावा लागतो. यामुळे कार खरेदी सोपी होते आणि खिशावर जास्त बोजाही पडत नाही. मात्र ही बाब पण लक्षात घ्यायला हवी की कर्जाची रक्कम जेवढी जास्त तेवढे अधिक व्याजही तुम्हाला द्यावं लागेल. कार ही अशी संपत्ती आहे की जिचे मूल्य वेगाने घटते. त्यामुळे मोठं कर्ज घेणं शक्यतो टाळावंच.
जर तुम्ही कमी कालावधीचं कर्ज घेताय तर तुम्हाला अधिक ईएमआय (EMI) द्यावा लागेल. जर तुम्ही ईएमआय वेळेवर भरत नसाल तर तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर याचा वाईट परिणाम दिसून येईल. कर्जाच्या रकमेवर काही अटीही लागू असतात. काही बँका कारची एक्स-शोरीम जितकी किंमत असते तेवढ्या रकमेचे कर्ज देतात. तर काही बँका कारच्या रकमेच्या ८० टक्के कर्ज देतात. याशिवाय कार कर्ज घेण्यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेसही द्यावे लागतात.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ८.३०-८.७५ टक्के
बँक ऑफ बडोदा ८.६५-१०.४०
अलाहाबाद बँक ८.६५-१०.९०
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ८.६५-११.०५
पंजाब अँड सिंध बँक ८.७५
बँक ऑफ महाराष्ट्र ८.७५-१०.२५
यूको बँक ८.८५-८.९५
युनियन बँक ऑफ इंडिया ८.८५-८.९५
पंजाब नेशनल बँक ८.९०-९.३५
स्टेट बँक ऑफ इंडिया ८.९०-९.६०
इंडियन बँक ९
इंडियन ओवरसीज बँक ९
हेही वाचा -
भारीच! SMS ने बदलता येणार टीव्ही चॅनेल
फुकट काॅलचा खेळ खल्लास! जिओही आकारणार आता शुल्क