Advertisement

फुकट काॅलचा खेळ खल्लास! जिओही आकारणार आता शुल्क

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने आता इतर कंपन्यांच्या मोबाइलवर काॅल करण्यासाठी शुल्क आकारणार असल्याची घोषणा केली आहे. जिओच्या ग्राहकांना इतर कंपन्यांच्या मोबाइलवर काॅल करण्यासाठी प्रति मिनिट ६ पैसे द्यावे लागणार आहेत.

फुकट काॅलचा खेळ खल्लास! जिओही आकारणार आता शुल्क
देशातील सर्वात मोठी
SHARES

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने आता इतर कंपन्यांच्या मोबाइलवर काॅल करण्यासाठी शुल्क आकारणार असल्याची घोषणा केली आहे. जिओच्या ग्राहकांना इतर कंपन्यांच्या मोबाइलवर काॅल करण्यासाठी प्रति मिनिट ६ पैसे द्यावे लागणार आहेत. जिओने आपल्या ग्राहकांना शुल्क आकारलं असलं तरी त्या बदल्यात जिओ ग्राहकांना तेवढ्याच पैशांचा डेटा मोफत देणार आहे. आतापर्यंत जिओ फक्त इंटरनेट डेटासाठी शुल्क आकारत होती आणि दुसऱ्या कोणत्याही नेटवर्कवर मोफत व्हाईस काॅलिंगची सुविधा देत होती. 

दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडून कॉल टर्मिनेशन चार्ज (आययूसी) रद्द करण्याचा निर्णय घेण्यास उशीर होत आहे. त्यामुळे जिओने जिओने व्हाईस काॅलिंगवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. ट्रायने २०१७ मध्ये आययूसी शुल्क १४ पैशावरून कमी करून ६ पैसे प्रति मिनिट करून हे शुल्क २०२० पर्यंत रद्द करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता ट्रायने ही मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे का अशी विचारणा कंपन्यांना केली आहे. जर ट्रायने ही मुदत वाढवली तर जिओवर आययूसीचा मोठा बोजा पडणार आहे. त्यामुळे कंपनीने  व्हाईस काॅलिंगवर शुल्क आकारून याची भरपाई सुरू केली आहे. 

जिओला कॉल टर्मिनेशन चार्जपोटी ३ वर्षात आपल्या प्रतिस्पर्धी  भारती एअरटेल, वोडाफोन आयडीया या कंपन्यांना १३ हजार ५०० कोटी रुपये द्यावे लागले आहेत. ट्रायच्या या निर्णयामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी जिओने हा निर्णय घेतला आहे. 



हेही वाचा - बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?

महागाई भत्त्यातील वाढीने सेन्सेक्स, निफ्टी उसळले

बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा