Advertisement

महागाई भत्त्यातील वाढीने सेन्सेक्स, निफ्टी उसळले


महागाई भत्त्यातील वाढीने सेन्सेक्स, निफ्टी उसळले
SHARES

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ दिसून आली. सेन्सेक्स ६४५.९७ अंकांनी उसळून ३८,१७७.९५ वर बंद झाला. तर निफ्टीनेही १८६.९० अंकांची मोठी वाढ नोंदवली. निफ्टी ११,३१३.३० वर स्थिरावला. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने लोकांकडे खर्च करण्यासाठी अधिक पैसे असतील. यामुळे मागणी वाढण्याची आशा आहे. एका वर्षापासून सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न सातत्याने सरकार करत आहे. 

सरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. बीएसईमध्ये बँकिंग निर्देशांक साडेतीन टक्क्यांनी तर वित्तीय निर्देशांक तीन टक्क्यांनी  वधारला. इंडसइंड बँक, एसबीआय, भारती एयरटेल, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि कोटक बँक आदी शेअर्स चांगले वधारले. तर येस बँक, हीरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक, आयटीसी आणि टीसीएसचे शेअर्स घसरले. येस बँकेचा शेअर्स पाच टक्क्यांनी घसरला. 



हेही वाचा  -

बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?

SBI चं कर्ज झालं स्वस्त, पण ठेवींवरील दरही घटले




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा